Letest News
पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ... शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन जिल्हा कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात उत्साहाचा नवा संचार
राजकीय

पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांना एका पत्रकाराची टक्कर..

प्रभाग पाच मधून पेनाच्या निंब या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवीत असणारे ज्येष्ठ पत्रकार माधव ओझा यांचे मतदान करण्याचे मतदारांना आवाहन!

sai nirman
जाहिरात

शिर्डी ( प्रतिनिधी) राहता तालुक्यात असणारे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गेलेले एक मोठे ऐतिहासिक गाव असणाऱ्या आणि दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पुणतांबा गावची ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होत आहे .
लोकनियुक्त सरपंच पदासाठी महिला अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. या सोबत गावचा कारभार हा महिलाच चालवतील कारण नऊ महिला येथे आरक्षित जागेवर ग्रामपंचायत सदस्य असणार आहे.
अशा या सुमारे बारा हजार मतदार असलेल्या ग्रामपंचायतीत रस्ते ,पाणी योजना , गटार हे प्रमुख मुद्दे बनवून विखे ,कोल्हे काळे यांचे कार्यकर्ते पॅनल लढवीत आहेत.

DN SPORTS


वास्तविक पाहता गावच दळण वळण विस्कळीत झालं आहे. मुलांना कॉलेजला जाण्यायेण्या गैरसोय आहे. त्यावर कुणी चकार शब्दही न काढता ही निवडणूक लढवली जात आहे.
गावात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकडे कुणाचेही लक्ष नाही .
या निवडणुकीत नऊ ग्रामपंचायत सदस्य महिला निवडून येणार आहेत व सरपंच ही लोकनियुक्त महिला सरपंच राहणार आहे. त्यामुळे येथे महिला काम करणार आहे. त्यामुळे इतरांनी महिलांच्या कामकाजात डोकावू नये. महिलांना स्वतंत्र कारभार करू द्यावे. त्यासाठीच आपण ही निवडणूक लढवीत असून आपण महिलांना स्वतंत्र गावचा विकास, कारभार करण्यासाठी मदत करणार आहोत.

kamlakar

गावाच्या विकासाला व नारीशक्तीला साथ देण्यासाठी आपण या निवडणुकीत पत्रकार असतानाही एक सामाजिक सेवा करण्याचा ध्यास उराशी बाळगून या निवडणुकीत लढत आहे. येथील बेरोजगार तरुण ,शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला नागरिक, शेतकरी ,मोल मजुरी करणारे कामगार, कर्मचारी, व्यावसायिक या सर्वांना सध्या गेल्या काही वर्षापासून अनेक छोट्या-मोठ्या समस्या प्रश्नांना येथे सामोरे जावे लागत आहे .हे प्रश्न ग्राउंड लेव्हलला पत्रकार म्हणून आपण चांगले जाणतो व त्या सोडवण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असतो व पुढेही करणार आहोत .पण त्यासाठी लोक चळवळीत काम करणे गरजेचे ठरते. म्हणून आपण या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून लोक चळवळीत काम करण्यासाठी आपणाकडे आपले बहुमोल मत मागत आहे. निवडणुका आल्या की सर्व काही आश्वासने आमिषे दिले जातात‌.

दाखवले जातात. सर्व काही यंत्रणा वापरल्या जातात. मात्र निवडणुकी झाली की परत पाच वर्ष सर्व काही विसरले जाते. असे पुढील पाच वर्षात तरी घडू नये. यासाठी आपण ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून असावं असं अनेक नागरिक मतदार महिला विद्यार्थी तरुण यांनी मला आग्रह केल्यानंतर आपण प्रभाग क्रमांक पाच मधून ही लोकाग्रस्तव निवडणूक लढवत आहे. तरी गावातील रस्ते, दळणवळण, रोजगार, उद्योगधंदे ,शैक्षणिक सुविधा, नागरिकांचे छोटे-मोठे प्रश्न, आदींचा पाठपुरावा करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा. त्यातून गावाचा विकास घडावा असाच आपला ही निवडणूक लढवण्याचा मुख्य हेतू आहे. तेव्हा आपण मला पेनाच्या निंब या चिन्हावर मतदान करून प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून द्यावे. हीच सर्वांना कळकळीची विनंती आहे. असे या जाहीरनाम्यात पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष म्हणून उभे असणारे माधव रामदयाल ओझा यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button