Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
अ.नगरक्राईम

शाळाही सुरक्षित नाहीत; राहात्यात पोलिसांचा धाक संपलाय का? जि.प. शाळेत घरफोडी-पोलिसी गस्त कुठे होती?

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राऊत वस्ती, केलवड बु. येथे झालेल्या घरफोडीने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेसारख्या संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी अज्ञात चोरटे सहज कुलूप तोडून चोरी करतात, याचा अर्थ गाव-वस्त्यांमध्ये पोलिसांचा वचक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुपारी ४ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शाळेचे मुख्य गेट, कार्यालय आणि पाकगृह फोडले जाते, मात्र एकाही टप्प्यावर पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळत नाही, ही बाब चिंताजनक आहे. रात्रीची गस्त नेमकी कुठे होती? गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती यांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर आहे,

असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी ठेवलेला धान्यसाठा चोरीला जाणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवण्यासारखे आहे. तरीही चोरीनंतरच गुन्हा दाखल होतो, प्रतिबंधात्मक कारवाई कुठे आहे? अज्ञात चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नसल्याने तपासाची दिशा व गतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून,


👉 रात्रीची गस्त वाढवणार का?
👉 संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त का नाही?
👉 सीसीटीव्ही, ग्रामसुरक्षा समित्या फक्त कागदावरच आहेत का?
असे थेट प्रश्न आता पोलिस प्रशासनाला विचारले जात आहेत.
जर शाळाच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button