Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Blog

शिर्डी जवळील निमगाव निघोज येथील मंगल कार्यालयात जेवणातून झालेल्या विषबाधेतील रुग्णांची सुधारत आहे तब्येत !

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी जवळील निमगाव निघोज येथील साई पालखी लगत असणाऱ्या मंगल कार्यालयात शिर्डी येथील संजय वामन त्रिभुवन यांच्या मुलीच्या लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर त्यांना शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल व श्री साईनाथ हॉस्पिटलला रात्री उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुमारे दीडशे च्या वर रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी डॉक्टर प्रीतम वडगाव यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दरम्यान या प्रकारामुळे शिर्डी परिसरात मोठी खळखळ उडाली असून हा प्रकार कसा घडला? कशामुळे घडला? याची चर्चा सध्या होत आहे. लग्नामध्ये सर्व नातेवाईक, जवळचे मित्रमंडळी, वऱ्हाडी मंडळी, व कुटुंबातील सदस्यही सर्व उपस्थित होते. वधू पित्यालाही जुलाब उलट्यांचा त्रास झाल्याचे समजते. जेवणातून विषबाधा झाल्याचे व या रुग्णांना शिर्डीतील दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्याचे वृत्त समजताच सर्व रुग्णांचे नातेवाईक, परिवार घाबरून गेले होते. त्यांनी शिर्डीला हॉस्पिटल कडे धाव घेतली. जो तो आपल्या परिवारातील सदस्य रुग्णांची विचारपूस करत होता दवाखान्यात गर्दी वाढली होती. मात्र साई संस्थांनच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तातडीने उपचार सुरू केल्याने रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे शिर्डीतील संजय वामन त्रिभुवन( शिर्डीकर) यांच्या मुलीच्या लग्नात जे केटरर्स देण्यात आले होते. ते त्यांचे सख्खे बंधू रमेश त्रिभुवन यांचे होते. साई प्रयागा असे त्या केटरर्स नाव आहे. त्यामुळे जेवणातून विषबाधा होण्याचा प्रकार कसा घडला? हा त्रिभुवन कुटुंबालाही मोठा अचंबित करणारा प्रश्न आहे.शिर्डीत त्रिभुवन परिवार हे प्रतिष्ठित व्यापारी व राजकीय परिवार असल्याने समाजात त्यांचे नाव खूप मोठे आहे.


आणि घरातील एक सदस्य हे नगरसेवक असल्याने जितके लोकं त्यांना मानणारे आहेत् तितकेच विरोधी ही आहेत्.
म्हणुन हया विषबाधा झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारण की हे शडयंत्र सुद्धा होऊ शकते. म्हणुन याची चौकशी होणे गरजेचे आहे. असेही बोलले जात आहे. मात्र सध्या रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. शिर्डीतील दोन्ही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची नावे पुढीलप्रमाणे आहेत–संगीता त्रिभुवन,लक्ष्मी बाई शिंदे,सुशीला शिंदे,सोनाली त्रिभुवन,पर्वताबाई त्रिभुवन,बत्तिशे सुनीता,बत्तीशे राधिका,आरणे कैलास,गायकवाड विकास, त्रिभुवन, आकाश ,त्रिभुवन प्रतिभा ,त्रिभुवन सरिता,बत्तीशे किरण,सरोदे वंदना ,सोळशे कार्तिक,आरणे निखिल,आराणे वंदना,काकडे नूतन,गायकवाड वैशाली,शिंदे रुपलाल राशिनाकर, रवींद्र मोरे,शुभम त्रिभुवन ,लता सरोदे ,कुणाल गोरख सरोदे ,वायदंडे अशोक ,त्रिभुवन रंजना ,पगारे शिवाजी ,निता पगारे ,सरोदे मच्छिंद्र ,सरोदे रंजना यांसह अनेक रुग्ण साईनाथ रुग्णालयात सुद्धा भरती झाले होते असे जवळपास 150 रुग्ण,आहेत. रुग्णालयातून शिर्डी पोलिस स्टेशनला एम एल सी पाठवलेली आहे पुढील तपास शिर्डी पोलिस स्टेशन करीत आहेत

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button