
शिर्डी प्रतिनिधी
साईबाबांची बदनामी करणाऱ्या भोंदू बाबांवर संस्थानने गुन्हा दाखल केला आहे संस्थान कडून रोहिदास माळी यांनी गुन्हा दाखल केला असून त्यात म्हटले आहे कि मी रोहीदास अशोक माळी, पोलीस उपनिरीक्षक तथा संरक्षण अधिकारी दि. 23/08/2025 रोजी स्वामी प्रमानंद महाराज नावाचा इसम श्री साईबाबांबद्दल बदनामी कारक व धार्मिक भावना दुखवणारे
वक्तव्य करुत असुन युट्युब व्हिडीओ हा युटयुब लिंक https://youtu. be/Krgw3-ww4bs?si=fGsoerQyesGQBJQetf अशी असून मजकुर घर में साई मुर्ती है जो कुए में फेंक दो और फोटो है तो आग लगा दो 184 करोड देवी देवतांओ को छोडकर एक मुस्लिम की पुजा करेंगे तो हमारे धर्म का क्या होगा ?
कई मंदिरो में साई की मुर्ती लगी है इसे हटवा देना चाहिए किसी पीर की पुजा क्यू जाये ? मंदिरो में आए दान से कसाई खाने की व्यवस्था चल रही है असे वक्तव्य केल्यामुळे माझ्या व अनेक साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
तरी इसम नामे स्वामी प्रमानंद पुरुजी महाराज यांनी वरील लिंक मधील व्हिडीओ मध्ये में साई मुर्ती है जो कुए में फेंक दो और फोटो है तो आग लगा दो 184 करोड देवी देवतांओ को छोडकर एक मुस्लिम की पुजा करेंगे तो हमारे धर्म का क्या होगा ? कई मंदिरो में साई की मुर्ती लगी है इसे हटवा देना चाहिए किसी पीर की पुजा करो की जाये ?
मंदिरो में आए दान से कसाई खाने की व्यवस्था चल रही है असे म्हणुन माझ्या व अनेक हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने तसेच वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व व्देषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. स्वामी प्रमानंद पुरुजी महाराज पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही याचे विरोधात कायदेशीर विविध कलमन्वय फिर्याद दाखल केली आहे