Letest News
साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ... गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मि... आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा साकुरीतील जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांची धाड ९ जणांवर गुन्हा ४५-५० जण उपस्थित असल्याची चर्चा शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम...
राजकीयशिर्डी

शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश

शिर्डी, दि. २३ जुलै : शिर्डी येथील श्री साईनाथ रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ, गुंतागुंतीची आणि जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. एका अल्पवयीन मुलाच्या गुदद्वारातून टोपणविरहित बॉलपेन शरीरात घुसून आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
रुग्णाला तातडीने श्री साईनाथ रुग्णालयात दाखल करून आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर वरिष्ठ जनरल सर्जन डॉ. श्रीराम नाईक यांनी लेप्रोस्कोपीद्वारे अत्यंत कौशल्याने शस्त्रक्रिया करत शरीरात खोलवर अडकलेला बॉलपेन सुरक्षितपणे बाहेर काढला. त्याचबरोबर जखमी झालेल्या आतड्यांवरही यशस्वी उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. महेंद्र तांबे, डॉ. गोविंद कलाटे आणि डॉ. प्राजक्ता बनकर यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच सिस्टर अनिता कडूस, ब्रदर सुनील सदफळ, सुनील चव्हाण, रवींद्र मते, मच्छिंद्र देवकर, प्रमोद गायके, दिलीप डुंबरे, तुषार आधुडे आणि संपूर्ण ऑपरेशन थिएटर टीम, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डॉ. श्रीराम नाईक, डॉ. महेंद्र तांबे आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. अत्यंत कठीण परिस्थितीत तत्परतेने निर्णय घेऊन रुग्णाचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि समर्पित वैद्यकीय पथकाच्या बळावर श्री साईनाथ रुग्णालयात अशा जटिल शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडत असून, गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याची रुग्णालयाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.


पालकांसाठी महत्त्वाचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भूलतज्ज्ञ डॉ. महेंद्र तांबे यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आजच्या सोशल मीडिया आणि रील्सच्या प्रभावामुळे लहान मुले अनेक धोकादायक कृतींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवावे, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि बॉलपेन, नाणी, प्लास्टिकचे तुकडे, खेळण्यांचे छोटे भाग यांसारख्या वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात. अशा प्रकारचा अपघात झाल्यास वेळ न दवडता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button