शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या हवेमध्ये दिसतात .त्यांना वाटतं श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही आपली जहांगीरच आहे .असं वाटतं पण ध्यानात ठेवा हे एक फक्त संस्थान आहे जस गावामध्ये एखाद्या मंदिरावर ट्रस्ट बॉडी असते त्या पद्धतीचा श्री साईबाबा संस्थान याच्यावर पण ट्रस्ट बॉडी नेमली जाते
गावामध्ये एखादं मंदिर असतं ते मंदिर किंवा ट्रस्ट बॉडी गावाचा मालक होऊ शकत नाही किंवा गावापेक्षा एखाद मंदिर मोठ असू शकत नाही त्याच पद्धतीने श्री साईबाबा संस्थान हे गावांमध्ये आहे श्री साईबाबा संस्थान मध्ये गाव नाही हे पहिले श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आणि तेथील अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवावे कुठलाही निर्णय घेतानी गावाला विश्वासात घेऊनच तो निर्णय श्री साईबाबा संस्थान अमलात आणू शकतात
शिर्डीचा जर इतिहास पाहिला तर आजपर्यंत श्री साईबाबा संस्थान मध्ये गावातील लोकच ट्रस्ट बॉडी मध्ये होते आणि काम पाहत होते हे विसरून चालणार नाही कारण हा सर्व कारभार श्री साईबाबा असतानी श्रीराम नवमी उत्सव दसरा जेवढे पण उत्सव श्री साईबाबांच्या मंदिरात होतात त्यामध्ये गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो हा इतिहास आहे
आणि श्री साईबाबा चरित्रामध्ये पण उल्लेख आहे हे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी ध्यानात ठेवावे श्री साईबाबा पासून आणि श्री साईबाबा संस्थाना पासून गावकऱ्यांना तुम्ही वेगळं पाडू शकत नाही हे ध्यानात राहू द्या नाहीतर इथे खूप अधिकारी आले आणि गेले ज्यांनी गावकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली ते जास्त काळ टिकले नाही हे ध्यानात ठेवावे
गावकरी तो राव काय करी हे म्हनं खरी आहे हे मुख्य कार्य कार्यकारी साहेबांनी विसरू नये आणि तुम्ही एक शासनाने नेमून दिलेले श्री साईबाबा संस्थानच्या देखभालीसाठी नेमलेले एक प्रशासकीय अधिकारी आहात म्हणजे तुम्ही मालक झाले असे समजू नका कुठलाही निर्णय घेताना तुम्हाला शंभर वेळेस विचार करावा लागेल
जे तुमच्या अधिकारात येतात तेच निर्णय तुम्ही घ्या गावाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका .सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो श्री साईबाबा तुम्हाला चांगली बुद्धी देवो. हीच अपेक्षा सुभाष शामराव कोतकर यांनी या पत्रात म्हटले.