
निलेश लंके खासदार झाल्याने अनेक तालुक्यातील विधानसभेची गणिते देखील बदलली आहेत. पारनेर तालुक्यात विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली आणि अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामध्येच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चुरशीची लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जिंकली आहे.
या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव करत सामान्य घरातील माणूसही खासदार होऊ शकतो हे दाखवून दिले. निलेश लंके यांच्या पत्नी राणी त्यांच्या बरोबरच राजकारणात आहेत. त्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
आता राणी लंके यांचे नाव पारनेर विधानसभेसाठी पुढं येऊ लागले आहे. याबाबत साम टीव्हीशी बाेलताना राणी लंके म्हणाल्या लोकसभा निवडणुकीसाठी जसा उत्साह होता तसाच उत्साह आता विधानसभेसाठी नागरिकांचा दिसून येत आहे.