Letest News
🚨 ब्रेकिंग न्यूज | शिर्डीत पेरू विक्रेत्यांचा अचानक रास्तारोको-वाहतुक ठप्प 🚨 सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय? EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई
राजकीयशिर्डी

साईबाबा म्हणजेच शिवस्वरूप… शिर्डीत रंगणार भव्य-दिव्य श्री साई–शिव लघुरुद्राभिषेकाचा महासोहळा 🌺

[21:26, 18/1/2026] ………..: शिर्डी | विशेष प्रतिनिधी
साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातून भाविक येणाऱ्या पावन शिर्डीनगरीत
आता साई–शिव एकरूपतेचा दिव्य अनुभव देणारा ऐतिहासिक धार्मिक सोहळा साकारत आहे.
‘ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन’ आणि ‘साई कुबेर भक्त ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या सहकार्यातून
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी
भव्य-दिव्य ‘श्री साई–शिव लघुरुद्राभिषेक’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
✨ “साईबाबा हेच साक्षात शिवस्वरूप आहेत”
या श्रद्धा व तत्त्वज्ञानातून २५१ यजमान जोडप्यांच्या हस्ते सामुदायिक लघुरुद्राभिषेक संपन्न होणार असून, हा सोहळा शिर्डीच्या धार्मिक इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय ठरणार आहे.
🔔 देशातील पवित्र तीर्थांचे जल – एका अभिषेकात!
या लघुरुद्राभिषेकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे
भारतभरातील आणि पवित्र तीर्थक्षेत्रांमधून आणलेले अमृततुल्य जल.
या अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या जलामध्ये समावेश आहे –
माँ नर्मदा
तापी, गोदावरी, कृष्णा
गंगा मैया व गंगासागर
प्रयागराज संगम
प्रवरा संगम
रामेश्वर येथील २१ कुंडांचे जल
अमरनाथ, हरिद्वार
घोड नदी, कुकडी नदी
👉 अशा अनेक पवित्र नद्यांचे व तीर्थांचे जल एका अभिषेकात एकत्र येणे, ही दुर्मिळ व अलौकिक घटना ठरणार आहे.
🔱 कुबेरेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुरोहित करणार पौरोहित्य
या पवित्र लघुरुद्राभिषेकाचे पौरोहित्य
गुजरातमधील कुबेर भंडारी येथील प्रसिद्ध कुबेरेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुरोहित करणार असून,
वैदिक मंत्रोच्चार, रुद्राध्याय पठण आणि शिवोपासनेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
💠 या संपूर्ण पूजेचा व आयोजनाचा सर्व खर्च ‘साई कुबेर भक्त ग्रुप’तर्फे करण्यात येत असून,
हा सोहळा पूर्णपणे सेवाभावातून साकारण्यात येत आहे.
🕉️ यजमान जोडप्यांसाठी सविस्तर नियम व माहिती
🔹 यजमान संख्या : फक्त २५१ जोडपी (मर्यादित प्रवेश)
🔹 आयोजकांकडून दिले जाणार :
▪ पंचामृत
▪ सर्व पवित्र नद्यांचे जल
🔹 यजमानांनी सोबत आणायचे :
▪ स्वतःच्या घरातील महादेवाची पिंड (शिवलिंग)
▪ पूजेचे साहित्य
(संपूर्ण साहित्य यादी नाव नोंदणीनंतर दिली जाणार)
👉 साईभक्त आणि शिवभक्तांना एकत्र आणणारा हा सामुदायिक अभिषेक सामाजिक व आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे.
🚩 पवित्र जलाची भव्य कलश यात्रा – शिर्डी होणार भक्तीपथावर
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता
लक्ष्मीनगर येथून
पवित्र जलाने भरलेल्या कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
📍 मिरवणूक मार्ग :
लक्ष्मीनगर नगरपालिका → कानिफनाथ मंदिर → पालखी रोड → ताजीम खान बाबा दर्गा → चावडी → मारुती मंदिर → शताब्दी मंडप (१६ गुंठे)
🔔 ढोल-ताशे, मंत्रोच्चार, हर हर महादेव व जय साईरामच्या गजरात ही मिरवणूक संपूर्ण शिर्डीत आध्यात्मिक चैतन्य निर्माण करणार आहे.
📅 मुख्य कार्यक्रम तपशील
🗓️ दिनांक : १९ जानेवारी २०२६
⏰ वेळ : सकाळी ८:३० ते सायं. ७:३०
📍 स्थळ : शताब्दी मंडप (१६ गुंठे), शिर्डी
👕 भक्तांसाठी पेहराव (Dress Code)
👨 पुरुष : सोवळे किंवा कुर्ता–पायजमा
👩 महिला : धवल (पांढरी) किंवा पिवळी साडी
📞 नाव नोंदणी व संपर्क
📱 विशाल कोळपकर (साई नेत्रम) – 9850780468
📱 लावण्या मॅचिंग सेंटर (साई निर्माण अकॅडमी जवळ) – 9588446992
📱 आनंद अग्रवाल (शिंदे वस्ती) – 9657618841
🙏 शिर्डी व परिसरातील सर्व साईभक्त व शिवभक्तांनी या भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक ‘साई–शिव लघुरुद्राभिषेक’ सोहळ्यात सहभागी होऊन
साई–शिव कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
[21:28, 18/1/2026] ………..:

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button