
शिर्डी (प्रतिनिधी) आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानींनी गेल्या पाच दिवसांपूर्वीच शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं होतं. यानंतर आज पुन्हा आकाश अंबानी यांनी आपल्या मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेत शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे.

विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सूर्याकुमारची पत्नी देविशा शेट्टी देखील उपस्थित होती. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्या होणाऱ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स विजयी होऊ दे म्हणून साई चरणी मनोमन प्रार्थना केली. आयपीएल सामने सुरु झाल्यानंतर आयपीएल मधील मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीण निता अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं होतं.
तसंच त्यांनी साईबाबांच्या धुपाआरती व शेजाआरतीला हजेरी लावली होती. मुंबई इंडियन्स टीम विजयी झाल्यानंतर साईंचे आभार अंबानी यांनी मानत मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. त्यानंतर 22 एप्रिल रोजी रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष व मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं होते.
यानंतर आता आज पुन्हा पाच दिवसानंतर आकाश अंबानी यांनी आपल्या मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेत साईबाबांच्या दर्शनासाठी ते शिर्डीत आले होते त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरतीही केली. साईदर्शनानंतर अंबानी व सुर्यकुमार यादवनं साईबाबांच्या द्वारकमाई व गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
यावेळी मंदिर परिसरात असलेल्या म्युझियम मध्ये जाऊन साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या वस्तूंची पाहणी केली. यादरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आकाश अंबानी आणि फलंदाज सुर्यकुमार यादव तसंच पत्नी देविशा शेट्टी यांचा साई मूर्ती व शॉल देऊन सत्कार केला. याप्रसंगी साईबाबा मंदीर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.