
शिर्डी प्रतिनिधी/ काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक कोटी रुपयांची लाच ग्रोवर प्रकरणात ठकसेन भूपेंद्र सावळे याच्याकडून घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू असताना त्या घटनेतून काही बोध घेण्याची गरज असताना दुसरी घटना घडली आहे

अधिक माहिती अशी की राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत १८ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांचा खडीने भरलेला डंपर राहाता पोलीस यांनी राहाता येथील कापसेंच्या गितगंगा हॉटेलजवळ पकडण्यात आला होता २१ सप्टेंबर रोजी लोकसेवक पोकॉ अनिल रामनाथ गवांदे, राहाता पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांना फोन करून बोलवून घेवुन राहाता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खडी, वाळु इ.ची वाहतुक करायची असेल तर दर महिन्याला वीस हजार-रुपये हप्ता दयावा लागेल असे म्हणून तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली.होती
तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगरकडे दि. २४ सप्टेंबर रोजी लाच मागणीच्या विरोधात तक्रार नोंदविली होती . प्राप्त तकारीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची लाचेची मागणीची पडताळणी केली असता
पोकों अनिल रामनाथ गंवादे, नेमनुक राहाता पो.स्टे, यांनी तकादार यांचेकडे राहाता पोलीस स्टेशन मध्ये खडी, मरूम तसेच वाळुची वाहतुक करण्यासाठी आणि डंपरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा वीस हजार रुपयाची लाचेची मागणी करून त्यापैकी १५ हजार रूपये स्विकारण्याची तयारी दर्शवली. २५ सप्टेंबर रोजी रोजी सापळा कारवाई दरम्यान पोलिस कर्मचारी अनिल गवांदे यांनी तकारदार यांचेकडुन १५ हजार रूपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे
गवंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते सदरची कारवाई अहिल्यानगर येथील .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजु अल्हाट . पर्यविक्षण अधिकारीः- पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपुटे सापळा पथक पोलीस नाईक चंद्रकांत भिमसेन काळे, शेखर बाळासाहेब वाघ, किशोर कुळधर, चालक दशरथ भिमराव लाख यांनी या कारवाईत भाग घेतला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, भारत तागडे
, अपर पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी .. सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे