शिर्डीतील शिंदे परिवाराचा नवरात्रोत्सवी उपक्रम
साईबाबांच्या समकालीन भक्त आई लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज तसेच शिर्डी शहरातील उद्योजक व हॉटेल गणपती पॅलेस चे सर्वेसर्वा साईभक्त सुनील निवृत्ती शिंदे व त्यांचे चिरंजीव सिद्धांत सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवानिमित्त एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. माऊलीनगर परिसरातील महिला भगिनींसाठी शिर्डी ते सप्तशृंगी वनी (गड) अशी धार्मिक यात्रा बसद्वारे आयोजित करण्यात आली. या यात्रेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या श्रद्धा-भक्तीने देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतल्या.

महिला भगिनींसाठी खास धार्मिक यात्रा
साईभक्त सुनील शिंदे व सिद्धांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या यात्रेमुळे शिर्डीतील महिला भगिनींना धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्याची अनोखी संधी लाभली. सप्तशृंगी वनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला घरगुती जबाबदाऱ्या सांभाळताना अशा यात्रांना जाण्याची संधी मिळत नाही. परंतु शिंदे कुटुंबीयांच्या प्रयत्नामुळे आज सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता आले, हा अनुभव अविस्मरणीय आहे.” यात्रेच्या मनोहर क्षणांचा आनंद घेत सर्व भाविकांनी भविष्यात देखील अशी यात्रेचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिंदे परिवाराचा सामाजिक व धार्मिक उपक्रमांचा वारसा
शिंदे कुटुंबीय वर्षभर धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित असतात. विशेष म्हणजे गणेशोत्सव हा त्यांचा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. यात कोणत्याही व्यक्तीकडून वर्गणी न घेता, मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात शिंदे परिवार भव्य भंडाऱ्याचे आयोजन करतो आणि गावातील मान्यवरांसह संपूर्ण गावकऱ्यांना महाप्रसादासाठी आमंत्रित करून भक्तिभावाने भोजन घालतो. त्यांच्या या कार्यामुळे शिर्डी परिसरातील भाविक व नागरिकांमध्ये शिंदे परिवाराबद्दल आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे.
साईबाबा चरणी प्रार्थना – सेवा अखंड सुरू राहो
धार्मिक उपक्रम, सामाजिक कार्य आणि श्रद्धेने समाजसेवा करणे ही शिंदे परिवाराची परंपरा असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. सुनील शिंदे व सिद्धांत शिंदे यांनी आश्वासन दिले की, आगामी काळात देखील असेच तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणत रहाणार आहोत. दैनिक साईदर्शन परिवार त्यांच्या या सेवाभावी कार्याला दंडवत प्रणाम करतो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा अखंड घडत राहावी यासाठी साईबाबा चरणी प्रार्थना करतो.
🌸 दैनिक साईदर्शन परिवाराकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌸