पोलीस अधीक्षकांची न्यारी खेळी!शिर्डीतील घटनेची व अवैध धंद्यांची स्वतः जबाबदारी टाळी!
शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीमध्ये नुकतीच साई संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांची निरपराध हत्या करण्यात आली. हत्या करणांऱ्या आरोपींना अटकही झाली व त्यांनी दारूच्या नशेत गुन्हा केल्याची कबुली दिली. मात्र शिर्डी मध्ये 1987 सालापासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दारूबंदी चा आदेश पारित केलेला होता. त्यामुळे येथे दारूबंदी असतानाही दारू कशी आली व आरोपींना दारू कुठे मिळाली? शिर्डीत दारू, गांजा ,अफीम मटका, जुगार असे अवैध धंदे सर्रास सुरू आहे व त्यामुळेच गुन्हेगारी वाढत असून अनेकदा साई भक्तांनी, ग्रामस्थांनी हे बंद होण्यासाठी मागणी केली आहे .शिर्डीतील दैनिक साई दर्शनचे संपादक यांनीही थेट उपोषण करून प्रशासनाकडे येथील अवैध धंदे व गुन्हेगारी नेस्तनाबूत करण्यासाठी उपोषण करून वेळोवेळी मागणी केली. विविध दैनिकांनी या संदर्भात आवाज उठवला. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. की जाणीवपूर्वक केले .मात्र दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत गेली.म्हणूनच खूणासारख्या घटना अधून मधून शिर्डीत घडत आहेत. याला जबाबदार कोण ?अशी मागणी आता साईभक्त, ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
शिर्डीत शिर्डीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अनेकदा त्यावर फक्त चर्चा होते ,अधून मधून तुरळक कारवाई केली जाते .मात्र ठोस अशी अवैध धंदे बंद होतील अशी कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. येथे अवैध धंदे तेजीत असतानाही दुर्लक्ष केले जाते. अवैध धंदे हे खाकी वर्दीच्या आशीर्वादाशिवाय चालणे शक्यच नाही. एका चित्रपटातील डायलॉग प्रमाणे पोलिस अगर चाहते तो मंदिर के सामनेसे चप्पलभी कभी चोरी नही हो सकती, !
कानून के हात बहुत लंबे होते है, असे नेहमी म्हटले जाते. मग असे जर असेल कोणाच्या आशीर्वादावर शिर्डीत अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्यामुळेच गुन्हेगारी वाढत आहे. येथे गुन्हेगारीतून अनेक टोळ्या कार्यरत आहेत. दिवसाढवळ्या धूम स्टाईल महिलांच्या गळ्यातील मौल्यवान दागिने पळवणे. मोटर सायकल मोबाईल चोरी, पाकीट मारी आदी करून पैसे कमवले जाता येत. दारू गांजा अफीम मटका जुगार वेश्या व्यवसाय आदी अवैध धंद्याद्वारे काळा पैसा कमवला जात आहे. हरामाची कमाई असल्यामुळे वेगवेगळ्या नशा करून परत पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे येथे अशा तरुणांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. मात्र या टोळ्यांवर वचक राहिला नाही. शिवीगाळ,धमकी दादागिरी ,हाणामारी, मारामारी, एवढेच नव्हे तर चाकू हल्ला ,मर्डर या पर्यंत या टोळ्यांची मजल जात आहे. आपले कुणी काही करत नाही अशी भावना निर्माण झाल्यामुळे या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत वाढली आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी देश विदेशातून साईभक्त येत असतात. त्यांना अशा गुन्हेगारी टोळ्यांकडून त्रास झाला. तर हा मेसेज देश-विदेशात जातो. त्यामुळे एक प्रकारे शिर्डीची बदनामी होते. याला कुठेतरी पाय बंद बसावा म्हणून अनेकदा साईभक्त ग्रामस्थ वृत्तपत्र यांनीही प्रयत्न केले. मात्र कुंपणच शेत खात असेल तर त्याला काय करणार? अशी परिस्थिती येथे निर्माण होत आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीला कोण जबाबदार आहे !कोणाचा पाठिंबा आहे !कोण अप्रत्यक्ष सहकार्य करीत आहे? याचाही शोध घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ही गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. व साई भक्तच काय ग्रामस्थांनाही दिवसाढवळ्या फिरणे मुश्किल होईल अशी आता साईभक्त विशेषतः महिला वर्गातून भीती व्यक्त होत आहे.
शिर्डीत नुकतेच खून झाले. त्यामुळे शिर्डीत मोठी चर्चा सुरू झाली. पोलीस प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला जाऊ लागला. त्यामुळे तातडीने शिर्डीच्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. एका अधिकाऱ्याची बदली करून नेमकी काय साधणार! संपूर्ण यंत्रणा येथे काय करते! विनाकारण एका सरळ स्वभावाच्या पोलीस निरीक्षकांची बदली केली. शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदार धरून त्यांची बदली केली गेली. मात्र संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच गुन्हेगारी सर्वत्र सुरू आहे अवैध धंदे सुरू आहे. मग याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची नाही का? शिर्डीत गुन्हेगारी वाढत आहे ,खून होत आहेत .याला जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार नाहीत का? या शिर्डीतील गुन्हेगारी अवैध धंदे खून याची जबाबदारी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्या पदाचा राजीनामा देणार का? किंवा आपल्या अधिकार क्षेत्रातील जिल्हा गुन्हेगारी ,अवैध धंदे आटोक्यात येत नसल्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करून घेणार का? अशी चर्चा आता शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागरिकांमधून होत आहे. केवळ देखाव्या पुरती तात्पुरती कारवाई करायची, व परत जैसे ती परिस्थिती असे अनेकदा शिर्डीकरांना व संपूर्ण जिल्ह्याला अनुभव आलेले आहेत. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनीच या जिल्ह्यातील संपूर्ण गुन्हेगारी व अवैध धंदे नस्तनाबूत करण्यासाठी लक्ष घालावे. अशी मागणी आता साईभक्त व ग्रामस्थांकडून होत आहे.