Letest News
EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली
अ.नगरराजकीय

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या! कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची नियुक्ती!

शिर्डी ( प्रतिनिधी )अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आलेल्या आहेत. कोपरगावला पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे आले आहेत. जिल्ह्यात 6 पोलीस निरीक्षक व 3 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी काढले. अधीक्षक घार्गे यांनी पदभार हाती घेताच पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या‌ आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नाशिक परिक्षेत्रातील बदल्यांचे आदेश महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढल्यानंतर जिल्ह्यातंर्गत बदल्याची उत्सुकता होती. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची बदली झाली आहे. रामकृष्ण कुंभार हे यापूर्वी शिर्डी येथे होते. शिर्डीत त्यांचे चांगले काम होते. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अकार्यक्षम अधिकारी राकेश ओला यांनी त्यांची बदली केली होती.

शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे जिल्हा अकार्यक्षम अधिकारी अधीक्षक राकेश ओला ला यांच्या कार्यकाळात मोठी गुन्हेगारी वाढली होती. मात्र आपल्या कर्तव्यात कसूर असताना येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यावर ठपका ठेवत त्यांची बदली करण्यात आली होती.

मात्र ते एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक असून जिल्ह्यात काही काळ काम केलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना हे माहीत असल्यामुळे त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच बदली केली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होणार आहे.

व कोपरगाव शहरामधून  समाधान व्यक्त होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंगळवारी जिल्हा पोलीस  अधीक्षक घार्गे यांनी नऊ पोलीस ठाण्याला नवीन प्रभारी अधिकारी दिले आहेत. पाथर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष मुटकुळे यांची शेवगाव ठाण्याच्या प्रभारीपदी बदली केली तर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांना पाथर्डी ठाण्याचे प्रभारी केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे.श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची बदली जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारीपदी करण्यात आली असून श्रीरामपूर तालुक्याला नियंत्रण कक्षातील अरूण धनवडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना कर्जत तर रामकृष्ण कुंभार यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांची बदली मिरजगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून

तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांना खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. दरम्यान, जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button