
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे एका महिलेचे धक्कादायक आरोप केले आहेत प्रताप दराडे यांनी विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे महिलेने सांगितले आहे

DN SPORTS
अत्याचार झाल्याचा दावा महिलेने केल्याने अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले असून पुढील तपासात काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे