शांत संयमी शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष शिर्डी गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश मकासरे यांची झाली पदोन्नती!
शिर्डी (प्रतिनिधी )आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी मध्ये गोपनीय विभागात कार्यरत असणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश मकासरे यांची पदोन्नती झाली आहे. त्यांना बढती मिळाली आहे .त्यामुळे त्यांचे पोलीस क्षेत्रांबरोबरच इतर क्षेत्रामधूनही अभिनंदन होत आहे.

शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थस्थान आहे. येथे देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात.येथे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्थानक व आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. त्यामुळे सर्वसामान्य भक्ता पासून तर अति व्ही व्ही आय पी साई भक्तांपर्यंत येथे सारखा ओघ सुरू असतो. त्यामुळे व्हीआयपी ची सुरक्षा, शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाल्यामुळे येथे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची सुरक्षा, येथे व्यवसाय वाढत आहेत. त्याचप्रमाणे साई भक्तांची संख्या वाढत आहे. साई भक्तांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे.शिर्डी हे छोटे गाव आता मोठे शहर बनले आहे. साहजिकच त्यामुळे येथे कितीही कायदा सुव्यवस्था चोखपणे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तरी काही प्रमाणात का होईना छुप्या मार्गाने काहीतरी भानगडी, अवैध धंदे सुरू असतात.
येथे अशी गुपचूप चालणारी गुन्हेगारी ,अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी शिर्डीमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे आहे .स्वतंत्र वाहतूक शाखा आहे .त्याचप्रमाणे उपविभागीय कार्यालय झालेले आहे. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डीची पोलीस स्टेशनची व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निवासस्थान इमारती या भव्य दिव्य अशा नुकत्याच बनवण्यात आल्या आहेत. असे सर्व शिर्डीत असताना येथे काही प्रमाणात का होईना गुन्हेगारीही दिसून येते. तिच्यावर वचक बसवणे, या गुन्हेगारीचे पालेमुळे शोधून काढणे. कोण काय करतो यावर लक्ष ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील याकडे लक्ष देणे.हे गोपनीय शाखेचे काम येथे सक्षमपणे सुरू आहे.शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे आयबी सीआयडी व पोलीस स्टेशनला गोपनीय शाखा कार्यरत आहेत. व या शिर्डी पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे कामकाज हे गेल्या सहा वर्षांपासून अविनाश मकासरे हे समर्थपणे सांभाळत आहेत. सदरक्षणाय! खलनिग्रणाय!! या पोलीसी ब्रीदवाक्या प्रमाणे अविनाश मकासरे हे येथे आपले प्रामाणिक, निस्वार्थीपणे व शिस्तबद्ध कर्तव्य पार पाडताना दिसतात.
आपले गोपनीय शाखेत काम करत असताना आपल्या कामकाजा बरोबरच शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व गुप्त खबर, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने माहिती घेणे, सध्या सुरू असलेल्या राजकीय सामाजिक घडामोडींची वरिष्ठांना माहिती कळवणे, त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर यांच्याशी सलोख्याचे संबंध, व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून घेतलेले निर्णय त्यामुळे अविनाश मकासरे यांना आपल्या कर्तव्यात नेहमी यश मिळत गेले. मात्र गोपनीय शाखेत असल्यामुळे व त्यांचा स्वभाव शांत संयमी असल्यामुळे ते कधीही प्रसिद्धी पुढे आले नाही. मात्र त्यांचे काम हे खरोखर प्रशासंना करण्यासारखे आहे.
त्यांचे कर्तव्य त्यांचा अनुभव व पोलीस खात्यात गोपनीय शाखेत काम करत असताना प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा या सर्वांची दखल घेत त्यांना गृह विभागाने नुकतीच पदोन्नती दिली आहे. त्यामुळेच अविनाश मकासरे यांचे सर्व क्षेत्रामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी व ग्रामस्थ, साईभक्त यांच्या मधूनही मनापासून अभिनंदन होत आहे. दैनिक साईदर्शनच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आहे.