राज्यात एकूण 21 नवीन जिल्हे तयार करण्याचे सरकारकडून होत आहे नियोजन! शिर्डी संगमनेर श्रीरामपूर जिल्हे होण्याची शक्यता!

शिर्डी (प्रतिनिधी) राज्यामध्ये नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. राज्य सरकारने नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या प्रशासकीय सोयीसाठी मोठा बदल घडणार आहे.

राज्यातील विधिमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी नवीन जिल्ह्यांची मागणी केली. राज्य सरकारने यासाठी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. या समितीत वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते सहभागी आहेत.
विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्हा निर्मितीचा पाठपुरावा केला आहे. त्याचप्रमाणे खामगाव जिल्ह्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार, राज्यात २१ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुक्यांची निर्मिती करण्याची योजना आहे.
प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित असल्याचं बोललं जातंय राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होते
येत्या 26 जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता ही आहे
महाराष्ट्राची स्थापना एक मे 1960 रोजी झाली तेंव्हा
राज्यात फक्त 26 जिल्हे होते यामध्ये ठाणे कुलाबा म्हणजेच आत्ताच रायगड रत्नागिरी बृहण मुंबई नाशिक धुळे ,पुणे, सांगली ,सातारा, कोल्हापूर ,सोलापूर ,औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड ,बुलढाणा ,अहमदनगर, अकोला, अमरावती ,नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा म्हणजेच आत्ताच चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होता .
नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढत गेली वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासनाच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या आणि त्यातूनच नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली.
रत्नागिरीचे विभाजन होऊन नंतर सिंधुदुर्ग हा नवा जिल्हा तयार झाला छत्रपती संभाजीनगरचे विभाजन होऊन जालना हा जिल्हा तयार झाला धाराशिव मधून नवा लातूर जिल्हा तयार झाला तर चंद्रपूरचं विभाजन होऊन नवा गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला बृहण मुंबई जिल्ह्यातून विभाजन होऊन नवी मुंबई उपनगर नगर हा जिल्हा तयार झाला तर अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा वाशिम जिल्हा तयार झाला. धुळ्यातून आदिवासी बहुल नंदुरबार तर परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला.
विदर्भातील भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन नवा गोंदिया जिल्हा तयार झाला तर ठाणे जिल्ह्याचं नुकतंच विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला .अशाप्रकारे 10 नवीन जिल्हे मागच्या 20 वर्षात तयार झाले. त्यानंतर आता बदलत्या काळात नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची गरज आणखीन वाढली आहे.
कोणत्याही जिल्ह्यातील एका शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जर जिल्हा मुख्यालयाला भेट द्यायची असेल तर त्याला संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. यामुळे नागरिकांची हेडसांड होते. जिल्ह्याची काम करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते दोन दिवस खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सुलभ व्हावी या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण 21 नवीन जिल्हे तयार करण्याचे नियोजन सरकारकडून आखण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्याचे विभाजन होवून
मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत तर अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार होतील .ठाणे जिल्ह्याचे आणखीन विभाजन करण्याचा प्लॅन असून मीराभाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्याचं प्रस्तावित आहे.
ठाणे जिल्ह्यातून तयार झालेल्या पालघर जिल्ह्याचं देखील विभाजन करण्यात येईल. पालघर जिल्ह्याचं विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातून बारामती हा नवा जिल्हा तयार करण्याचं प्रस्तावित आहे .रायगड मधून महाड जिल्हा तर सांगली मधून सांगली सातारा सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा असणाऱ्या भागांचा एक स्वतंत्र असा मानदेश जिल्हा तयार केला जाणार आहे. अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.