Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरराजकीय

जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

अहमदनगर, दि.२०- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग विळदघाट येथील जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे बालाजी बिराजदार, ग्रामोद्योग अधिकारी बी.आर. मुंडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. उदय नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षण घेत जीवनात यश संपादन करावे. महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात युवक-युवतींना सक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयामध्ये सुरू केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील अकोले तालुक्यात ३ प्रशिक्षण केंद्र, कर्जत २, कोपरगाव ६, अहमदनगर ११,नेवासा २, पारनेर २, पाथर्डी ४, राहाता १३, राहुरी ४, शेवगाव २, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १, संगमनेर २ आणि जामखेड येथे एक अशा ५० महाविद्यालयातुन सुरू होत असलेल्या या केंद्रांमधुन ८ हजार २५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहा प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व विश्वकर्मा कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रवेश नोंदविण्याचे आवाहन
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी संबंधित महविद्यालयांमध्ये रोजगार, स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपला प्रवेश नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button