Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
अ.नगरशिर्डी

श्री साईनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलना निमित्त 23 24 व 25 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन!

शिर्डी( प्रतिनिधी ) शिर्डी येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या श्री साईनाथ प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी चा 68 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाला असून या विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ निमित्ताने 24 व 25 जानेवारी दरम्यानही विविध कार्यक्रम होत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीत झाले. या कार्यक्रमाला राकेश कलासागर (सीनियर एस पी अमरावती) तसेच शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर , यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी शाळा समितीचे प्रमुख कार्यवाह व चेअरमन श्रीमती छाया फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, नियमक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक मुथा, शाळा समितीचे को चेअरमन मनोज लोढा, खजिनदार प्रकाश गांधी आदी सह साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डुबल अभिमन्यू, मुख्याध्यापिका सौ मंगल आगलावे, शंकर बेलदार ,शुभांगी देशपांडे ,सिद्धार्थ कोबारणे ,उषा वहाडणे,

आदीसह विद्यार्थी प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते. यावेळी या विद्यालय ,महाविद्यालयातील विविध स्पर्धेत व शैक्षणिक गुणवत्तेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषके मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.


त्याचप्रमाणे 24 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी सकाळी साडेआठ वाजता येथे स्नेहसंमेलन निमित्त वऱ्हाड निघालं लंडनला हा एकपात्री प्रयोग होणार आहे. त्याचप्रमाणे नंतर शारीरिक शिक्षण प्रात्यक्षिके होणार असून त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष
वमने हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी दोन वाजता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व राहत्याचे तहसीलदार अमोल मोरे उपस्थित राहणार आहेत.


त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी दोन वाजता प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिर्डीचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व साई संस्थान मंदिर विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा. कार्यक्रमाला येताना निमंत्रण पत्रिका पालकांनाही तसेच विद्यार्थ्यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे .असेही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button