अज्ञात आरोपीने भोजनगृहा जवळ सोडून दिलेल्या बालकाचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू
अज्ञात आरोपीने भोजनगृहा जवळ सोडून दिलेल्या बालकाचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू
शिर्डी प्रतिनिधी/
अज्ञात आरोपीने दोन महिन्याच्या बालकास थंडी असताना बाळाला थंडी वाजु नये याची काळजी घेत लंगोट बांधुन रस्त्याच्या कडेला बेवारस सोडून दिल्याने या बालकाचा कुत्र्याच्या हल्यात दुदैवी मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता तपास लागत नसल्याने बहुधा परराज्यातील अज्ञात आरोपीने या बाळास सोडून परागंदा झाली असावी असा कयास शिर्डी पोलीसांनी व्यक्त केला आहे
आधिक माहिती अशी की शिर्डी शहरा लगत असलेल्या प्रसादालय पार्किंग लगत असलेल्या ओढ्यालगत एक ते दोन महिन्याच्या बालकास कुत्रे ओढत घेऊन जात असून कुत्र्यांना हाकलून दिले असून बाळाच्या अंगात निळ्या रंगाचे स्वेटर व लंगोट घातलेले आहे व कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडलेले आहेत व मानेचा भाग देखील खाल्लेला आहे अशी माहिती सोमनाथ जाधव यांनी शिर्डी पोलिसांना देताच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील व पथकाने तात्काळ ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घटनास्थळी भेट देऊन प्रेताचा पंचनामा करत प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले शवविच्छेदन अहवालात सदर लहान बाळास प्राण्यांनी तोंडास मानेवर चावा घेतल्याने शोषण नलिका व तोंडास व मानेस गंभीर दुखापती झाल्याने व प्राण्यांनी चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात पुढे आले आहे रात्रीच्या सुमारास वरील ठिकाणी एक ते दोन महिन्याच्या बाळाला काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या व त्यास उघड्यावर सोडून दिल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा प्राण्यांनी चावा घेतल्यास बाळाच्या जीवास धोका होऊ शकतो हे माहीत असताना बाळाचा त्याग करण्याचे हेतूने त्यास उघड्यावर सोडून दिले व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपीचे विरोधात शिर्डी पोलिसांनी भादवी ३०४,३१७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेने शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संभाजी पाटील हे करीत आहे
अज्ञात आरोपीने भोजनगृहा जवळ सोडून दिलेल्या बालकाचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू