श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो साईभक्तांनी समाधी दर्शन घेतले. मंदिर आणि परिसरात मुंबईतील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई आणि समुद्र मंथनातून प्रकटलेल्या रत्नांवर आधारित ‘श्री साईरत्न’ भव्य प्रदर्शन उभारण्यात आले.
ओडिशा येथील दानशुर साईभक्त श्री सदाशिव दास यांच्या देणगीने मंदिर परिसरात मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली, जी साईभक्तांसाठी विशेष आकर्षक ठरली.
मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट
अखंड पारायण व मिरवणूक
मुख्य दिवशी व्दारकामाईत सुरु असलेल्या श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा समारोप सोहळा पार पडला. पारायणानंतर श्री साईबाबांच्या प्रतिमा व ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.
संस्थानाचे अध्यक्ष तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटके), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. मंदिर प्रमुख विष्णु थोरात, पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
: मिरवणुकीत सहभागी अधिकारी व साईभक्त
धार्मिक कार्यक्रम व भजन संध्या
सकाळी ९ वाजता शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थान अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि १० साईभक्त सहभागी झाले.
सकाळी १० वाजता ह.भ.प. सौ. शोभना देशपांडे, नाशिक यांनी किर्तन केले.
दुपारी १२.३० वाजता माध्याह्न आरती, १ ते ५.३० वाजता ‘साईभजन संध्या’ कार्यक्रमांचे आयोजन झाले.
सायंकाळी ५ वाजता खंडोबा मंदिराजवळ सिमोलंघन, ६.१५ वाजता धुपारती झाली, आणि ७.३० ते १० वाजता श्री शैलेंद्र भारती, मुंबई यांच्या ‘साईभजन संध्या’ कार्यक्रमानंतर ९.१५ वाजता रात्रौ श्रींच्या रथाची मिरवणूक पार पडली.
साईभजन’ संध्या आणि रथ मिरवणूक कार्यक्रमाचा क्षण
तृतीय दिवशी होणारे कार्यक्रम
उद्या, ३ ऑक्टोबर रोजी तृतीय दिवशी सकाळी ६ वाजता श्रींचे मंगलस्नान, ७ वाजता पाद्यपूजा, दुपारी १२.३० वाजता माध्याह्न आरती पार पडेल.
दुपारी १ ते ३ वाजता सौ. पद्मावती पारेकर (निनाद ग्रुप), पुणे यांच्या ‘साईभजन’ कार्यक्रमाचे आयोजन आहे.
दुपारी ४ ते ६ वाजता ह.भ.प. सौ. वर्षा टाकळीकर, बांद्रा पश्चिम यांचा एकादशी किर्तन कार्यक्रम होईल.
सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती, ७ ते ९.३० वाजता सौ. अश्विनी सरदेशमुख, मुंबई यांच्या ‘साईगीतांजली’ कार्यक्रमासह शताब्दी मंडपावर स्टेजवर कार्यक्रम पार पडेल. रात्री १० वाजता श्रींची शेजारती संपन्न होईल.