
सावळीविहीर येथे मराठा आरक्षण मागणी मान्य झाल्याने मनोज जरांगे पा.व राधाकृष्ण विखे पा.यांच्या जय घोषाने . पेढे वाटून .फटाक्याच्या आतिषबाजीत .आनंद उत्सव साजरा…

मनोज जरांगे पा.यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीला यश मिळाल्याने राहता तालुक्यातील
सावळी विहीर गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला..
या वेळी .मनोज जरांगे पा.व ना राधाकृष्ण विखे पा.यांच्या जय घोषाने परिसर दणाणला..नगर मनमाड रोड वर ग्रामस्थानी एकमेकांना पेढा भरवत.फटाक्याच्या आतिश बाजीत जल्लोष साजरा केला.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलना चे नेतृत्व करणारे श्री मनोज जरांगे पाटील आणि त्यांना अतिशय कुशल आणि कसब व आपल्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा संपूर्ण अनुभवाचा योग्य तो अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन नामदार राधाकृष्ण विखे यांनी आपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार फडवणीस यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ असा अभिमान वाटेल असा मसुदा मराठा आंदोलकाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांचे पुढे मोठ्या धैर्याने व धाडसाने सादर केला
त्यामुळे विखे परिवाराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतीय जनता पार्टी व महायुती चे सरकार मध्ये आणि सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये एक उच्च असे मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे ..
असे .मत श्री बाळासाहेब जपे पाटील अखिल भारतीय सरपंच परिषद महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले .
तर या मराठा आरक्षण मागणीसाठी..सर्व जाती..धर्मातील लोकांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला. संपूर्ण राज्यातून. सर्व धर्मियांनी मदत केली या सर्वांचे आभार गणेश कापसे यांनी मानले.
या प्रसंगी सोपानराव पवार.नवनाथ जपे. गणेश आगलावे. आगलावे.शांताराम जपे.पत्रकार राजेंद्र
दुनबळे.आनंद जपे. सुनील जपे.मनोज जपे.अनिल कापसे.ऋषिकेश जपे.एकनाथ आरने. राजेंद्र कापसे.कृष्ण जपे. राहुल आगलावे.सुनील आगलावे. शरद गडकरी.आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.