Letest News
सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय? EXCLUSIVE: ‘कॅप्टन खरात’चा प्रभाव की संगनमत? साई संस्थान कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे मोठा कट असल्या... कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर शिर्डीत रक्तरंजित हल्ला-पेरूच्या कारणावरून डोक्यात फळी घालून ठार मारण... EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा!
क्राईमशिर्डी

सुसाईड नोटमध्ये नाव- FIR मध्येही उल्लेख-तरी चार्जशीटमधून ‘अशोक खरात’ गायब — नेमकं चाललंय काय?

शिर्डी | प्रतिनिधी (दैनिक साई दर्शन विशेष मालिका)
साई संस्थान कर्मचारी विकास रामदास दिवटे आत्महत्या प्रकरणात आता सर्वात धक्कादायक वळण समोर आले आहे. मयताने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे नाव स्पष्टपणे नमूद असल्याची माहिती समोर आली असतानाच, याच नावाचा उल्लेख एफआयआरमध्येही करण्यात आला होता. मात्र, पुढे दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमधून अशोक खरातचे नावच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत आणि प्राथमिक तपासात ‘अशोक खरात’ याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मयत व्यक्तीवर मानसिक दबाव, धमक्या आणि त्रास दिल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय स्पष्टपणे व्यक्त करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्येही त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
मात्र, तपासाची पुढील प्रक्रिया पूर्ण होत असताना सादर करण्यात आलेल्या चार्जशीटमधून अशोक खरातचे नाव अचानक गायब झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. इतक्या गंभीर प्रकरणात, सुसाईड नोट आणि एफआयआरमध्ये नाव असलेली व्यक्ती चार्जशीटमधून कशी व का वगळली गेली? यामागे कोणाचा दबाव किंवा प्रभाव होता का? असे थेट प्रश्न उपस्थित होत आहेत.


⚠️ तपासावरच प्रश्नचिन्ह
सुसाईड नोटसारखा महत्त्वाचा पुरावा आणि एफआयआरमधील स्पष्ट उल्लेख असूनही संबंधित व्यक्तीचे नाव चार्जशीटमधून वगळले जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔥 ‘कॅप्टन खरात’ला कोणाचे संरक्षण?
शिर्डीत वादग्रस्त ठरलेले ‘कॅप्टन खरात’ हे नाव पुन्हा चर्चेत आले असून, त्याला कोणत्या प्रभावशाली व्यक्तींचे संरक्षण मिळत आहे का? अशी चर्चा रंगली आहे. विशेषतः आधीच संगनमत आणि आर्थिक तडजोडीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिकच गंभीर ठरत आहे.


🛑 चौकशीची मागणी तीव्र
चार्जशीटमधून नाव वगळण्याचा निर्णय कोणी घेतला? कोणत्या कारणावरून घेतला? याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून सत्य बाहेर आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
👉 पुढील भागात:
✔️ सुसाईड नोटमधील नेमके उल्लेख
✔️ एफआयआर ते चार्जशीट — नेमका बदल कुठे झाला?
✔️ ‘कॅप्टन खरात’ला मिळालेले कथित संरक्षण उघड
फक्त दैनिक साई दर्शनवर…

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button