Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
Blog

कै. विठ्ठलराव मनाजी गडकरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

आज कै. विठ्ठलराव मनाजी गडकरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अतिशय प्रामाणिक आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व असलेल्या विठ्ठलराव यांच्या काही आठवणींना उजाळा देत दैनिक साई दर्शन परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

sai nirman
जाहिरात

आमचे मित्र राजेंद्र गडकरी यांच्या सावळीविहीर येथे घरी गेल्यावर दाराजवळ भर उन्हात त्यांचे वडील विठ्ठलराव मनाजी गडकरी याची भेट व्हायची साधे भोळे कुटंब घरासमोर गाय एकीकडे चुलीवर कायम पाणी गरम होण्यासाठी भगुने दुसरीकडे वहीणीचा सुरू असलेला स्वयंपाक तर दुसरीकडे आंजी भाजी निसताना दिसणार तसेच विठ्ठलरावाची भेट झाली की पहिला रामराम राजु कुठे घरात असेल विचारा नाहीतर गावात असेल हा ठरलेला मोजक्या भाषेतील संवाद फारच पुढे गेले

DN SPORTS

तर साहेब काय चाललंय तुमच चहा घ्या जेवन करा असा आग्रह परिस्थिती नसताना श्रीमंतांना देखील लाजवणारा व अंतर्मुख करणारा आग्रह अन् विठ्ठलरावाकडे बघितले की साधी राहणी पांढरा शर्ट पायजमा आपण आपले घर आपले काम व आपले जीवन कोणाबद्दल तक्रारार नाही जीवनात सुख दुःख चांगले वाईट प्रसंग असो त्याला सामोरे जात त्या बद्दल नकारात्मक विचार न करता आलेला दिवस समाधानी कशा पद्धतीने जाईल हा नित्यक्रम असणारे विठ्ठलराव खरोखरच विठ्ठलाचे वारकरी म्हणावे लागेल पैशाचा नसलेला मोह कोणाबद्दल ही नसलेली इर्षा दुसऱ्या मानसाच्या आनंदात आंनद मानणारी ही मानस जगावे कसे हा मंत्र आजच्या जमान्यात भावी पिढीला देऊन जातात

kamlakar

तोच वारसा आमचे मित्र राजेंद्र गडकरी यांच्या मध्ये देखील दिसून येतो दोन तीन लाख रुपये काहीजण देत असताना नकार देण्याचे धाडस पैशाचा मोह नाही कायम सर्व सामान्य दिन दलितांच्या उद्धारासाठी लिखाणातुन आवाज उठवत आपले काम सुरू ठेवत जीवनातील संघर्ष करत वाटचाल करणारे आमचे मित्र खरोखरच वडिलांच्या पावलावर पाऊल समाजासाठी योगदान देत आहे त्यांना या दुखातुन सावरण्यासाठी शक्ती परमेश्वर देवो हिच प्रार्थना तसेच कै विठ्ठलराव गडकरी सारख्या अशा या महान व्यक्तीमत्वास त्यांच्या निधनाबद्दल दैनिक साई दर्शन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button