Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
राजकीयशिर्डी

नेतृत्व हरपलं-काळजाला चटका-शिर्डीत स्व. अजितदादांना श्रद्धांजली राजकारणाच्या पलीकडचा नेता हरपला

सर्वपक्षीय ग्रामस्थांनी स्व. अजितदादा पवार यांना अश्रुपूरित श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकारणातील बुलंद नेतृत्व, सर्वसामान्यांचा आधार आणि जनतेच्या मनात घर केलेले व्यक्तिमत्त्व स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे, तर जनतेचा खरा हितचिंतक हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या दु:खद पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषद कार्यालयात आज (दि. 30 जानेवारी 2026) सकाळी ठीक 11 वाजता सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

शोकसभेदरम्यान स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. काही क्षण संपूर्ण परिसर स्तब्ध झाला… मनात वेदना आणि ओठांवर मौन ठेवून उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
जनतेसाठी अखेरपर्यंत झटणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांचे कार्य, विचार आणि आठवणी जनतेच्या मनात सदैव जिवंत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकदिलाने एकत्र येत स्व. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.
ही शोकसभा केवळ कार्यक्रम न राहता, जनतेच्या अश्रूंनी वाहणारी भावनिक आदरांजली ठरली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button