शिर्डी साकुरी शिवारात एच.पी पेट्रोल पंपा समोर उभ्या पिकअप मधून चालकाचे 17 हजार रुपये किमंतीचे दोन विवो कंपनीचे मोबाईल चोरी!
शिर्डी (प्रतिनिधी )
नगर मनमाड रस्त्यावर साकुरी शिवारात एच.पी पेट्रोल पंपा समोर एका थांबलेल्या पिकअप वाहनांमधून या पिकअप च्या चालकाचे सतरा हजार रुपये किंमतीचे दोन विवो कंपनीचे मोबाईल अनोळखी तीन चोरट्यांनी पळून नेल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की ,पाटस ता. दौंड येथील धीरज सुरज लोखंडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण आदेश ट्रान्सपोर्ट मध्ये चालक म्हणून काम करत असून आपण मोबाईल टॉवरचे सामान घेऊन कुरकुंभ एमआयडीसी येथून नंदुरबार येथे निघालो असता दौंड अहमदनगर राहुरी राहता असा प्रवास करून साकुरी शिवारातील एचपी पेट्रोल पंपा जवळ आलो असता तेथे मला झोप लागल्याने गाडी थांबून मी गाडीत झोपलो .तेथे 16 ऑक्टोबर 2023 च्या रात्री अडीच वाजेच्या दरम्यान तिन अनोळखी ईसम तिथे आले .
काच वाजवली असता मी उठलो व काच उघडली असता त्यांनी माझे सात हजार रुपये किमंतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल तर दुसरा दहा हजार रुपये किमंतीचा विवो कंपनीचा मोबाईल हा गाडीच्या समोरील आतील बाजूस डीश बोर्डावर ठेवलेला होता .या तीन अनोळखी इसमांनी माझे ते दोन मोबाईल घेऊन काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवरून ते पळून गेले. आपण त्यांचा दोन ते तीन किलोमीटर पाठलाग गेला मात्र ते मिळून आले नाही. लबाडीच्या, चोरीच्या इराद्याने माझे दोन सतरा हजार रुपये किमंतीचे मोबाईल या तीन अनोळखी इसमानी चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 973 नुसार भादवि कलम 34 /379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.