Letest News
अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी शनि शिंगणापूर देवस्थानचे तत्कालीन विश्वस्थ व उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गळफास घेऊन केली आ... कोपरगावात जप्त वाहनांचा २९ जुलै रोजी लिलाव बँकेच्या सेटलमेंट नावाखाली एकाची फसवणूक चार लाखाला घातला गंडा  शिर्डी तेथील ठकसेन भूप्या सावळेच्या अडचणीत वाढ आजून ३२८ गुंतवणूक धारकांनी गुन्हे नोंदविले  गुन्हेगारांना खाकीचा धाकच राहिला  चक्क महिला पोलिसाचा भररस्त्यावर मंगळसूत्र चोरांनी लांबविला   शिर्डीतून चोरीला गेलेल्या तीन कोटी वीस लाखाचे सोने पैकी ७५ लाख रुपये एल सी बीने हडप केले? श्री साईबाबा संस्थान नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 25 तारखे पासून पाराय... पुन्हा शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर उडविण्याची धमकी
क्राईमशिर्डी

आहो सोमनाथ कवडे ला गुजरातमधून पकडून आणल्याचे म्हणता !मग या घोटाळेबाज भूपेंद्र पाटील साळवे ला कधी पकडून आणता?

शिर्डी( प्रतिनिधी)
राज्यांमध्ये शेअर्स ट्रेडिंग मार्केटिंगच्या नावाने बोगस कंपन्या काढून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून मोठी गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना फसवण्याचे राज्यात अनेक ठिकाणी प्रकार उघडकीस आले आहेत. अ.नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे असेच प्रकरण घडले असून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सोमनाथ कवडे यांने लाखो रुपये गुंतवणूक गोळा केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र नंतर परतावा देणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सोमनाथ कवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला व तपास सुरू केल्यानंतर फरार असणाऱ्या सोमनाथ कवडे याला गुजरात मधून पोलिसांनी अटक केली आहे. असे अनेक प्रकरणे असून संभाजीनगर येथेही असेच प्रकरण घडले होते.

तेथील मुख्य आरोपीला गुजरात मधील वेरावळ येथून अटक केली होती. असे अनेक प्रकार राज्यात घडत असून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या मालमत्तेची व बँक अकाउंटची चौकशी होत आहे. मात्र शिर्डीचा भूपेंद्र पाटील साळवे याने शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली परताव्याचे मोठे आमिष दाखवून सुरुवातीला गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला व विश्वास संपादन केला.

मात्र नंतर परतावा देणे बंद केले आहे. करोडो रुपये गुंतवणूक गोळा करत तो फरार झाला आहे. भूपेंद्र पाटील साळवे यांच्यावर शहादा येथे गुन्हा दाखल झाला आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी अश्या बोगस शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाने मोठी आमिषे दाखवून गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या संचालकांना पोलीस विविध ठिकाणाहून पकडून आणत आहेत. शेवगाव येथील सोमनाथ कवडे यांनी असाच शेअर ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करून फरार झाला होता.

त्यावर गुन्हा दाखल होताच गुजरात मधून स्थानिक गुन्हे अनवेशन विभातील पोलीसांनी पकडून आणले आहे. मात्र शिर्डी येथील शिर्डीतील ग्रो मोर शेअर ट्रेडिंग कंपनीचा चालक भूपेंद्र पाटील करोडो रुपये घेऊन फरार झाला आहे .व त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ह्या पोलिसांना तो सापडत कसा नाही? की प्रशासन त्यावर मेहरबान आहे.

हा मोठा प्रश्न गुंतवणूकदारांना पडत आहे. भूपेंद्र पाटील साळवे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पकडून चौकशीसाठी तात्काळ शिर्डीत आणणे गरजेचे होते. मात्र अद्याप तसे झालेचे दिसत नाही. याचा अर्थ काय समजायचा? कानून के हात बहुत लंबे होते है असे म्हटले जाते.

मग भूपेंद्र पाटील साळवे हा गुजरात मध्ये असो किंवा कुठेही असो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ज्याप्रमाणे शेवगाव येथील सोमनाथ कवडे यास पोलिसांनी गुजरात मधून पकडून आणले मग भूपेंद्र पाटील साळवे यांच्यावर पोलीस मेहरबान का? त्यालाही गुजरात मधून किंवा कुठेही असो पकडून आणून त्याची शिर्डीत चौकशी होणे गरजेचे असल्याचे गुंतवणूकदार खाजगीत बोलत आहेत.

तो कोट्यावधी रुपये घेऊन तिकडे ऐश करत आहे. इकडे गुंतवणूकदार मात्र आर्थिक संकटामुळे मेटाकुटीला आले आहेत. प्रत्येकाला आपले पैसे मिळतील ही आशा आहे. मात्र भूपेंद्र पाटील साळवे हा शिर्डीत आला पाहिजे. किंवा पोलिसांनी त्याला आणले पाहिजे तरच गुंतवणूकदारांचे पैसे मिळतील की नाही हे समजणार आहे .

असे गुंतवणूकदार खाजगीत बोलत आहेत. त्यासाठी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन शिर्डीत आणून त्याची मालमत्ता त्याचे बँकिंग अकाउंट स्टेटस सर्व तपासून ते सील करणे गरजेचे आहे. नाहीतर भूपेंद्र पाटील याचे वेळ काढूपणाचे धोरण हे अंगलट येऊ शकते व तो परदेशात फरार होऊ शकतो.

तेव्हा तात्काळ त्याला चौकशी साठी तब्येत घेणे गरजेचे आहे असे आता गुंतवणूकदारांमधून व ग्रामस्थांमधून खाजगीत बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button