
राहाता येथील 15 चारी उपनगरातील वै.सजन यशवंत सदाफळ ,वै.भाऊसाहेब सजन सदाफळ यांचे स्मरणार्थ विठ्ठल रुक्मिणी ,संत तुकाराम महाराज मंदिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वडणे व व्यवस्थापन समितीचे वतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

बाल गोपाळ विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा परीधान करून हरीनामाचा गजर करत उपस्थित भाविक, परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधले. यावेळी विधितज्ञ रामनाथ सदाफळ ,कैलास सदाफळ यांचे कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संस्कृती सदाफळ हिने आषाढी वारीचे महत्त्व उपस्थितांना समजावून प्रबोधन केले.यावेळी बालगोपाळांसह शिक्षकांनी पावलीचा ठेका धरला.अतिशय भक्तिमय वातावरणात बाल दिंडीचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी विनोद तोरणे,अमोल तुप विहीरे,भालचंद्र तांदळे,नागरे मॅडम,भिंगार दिवे सर,गायकवाड सर,सचिन आरणे,विधितज्ञ जय चौधरी ,सिदधांंत मुजमुले,स्वामी सदाफळ, मनोज सदाफळ, उपस्थित होते.