
दि.०८.०९.२०२५ रोजी
अशोकराव जगन्नाथ आगलावे, माजी सरपंच सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत राहणार-सावळीविहीर बुद्रुक ता. राहाता जि.अ.नगर यांनी ग्रामपंचायत सावळीविहीर बुद्रुक मधील गैरकारभाराची चौकशी करणेबाबतचा तक्रार अर्ज गटाविकास अधिकारी राहाता यांच्या कार्यालयास सादर केले होते त्यावर गटविकास अधिकारी यांनी अधिक चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी यांनी चौकशी अधिकारी म्हणुन नेमणुक केली आहे.
त्यात गटविकास अधिकारी यांनी म्हटले आहे कि सबब तक्रारीचे अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आणि संबधित तक्रारदार इ.चे समवेत प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन दस्तऐवजांची तपासणी करुन तसेच पुराव्याचे कागदपत्रांची पडताळणी करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल या कार्यालयास सादर करणेबाबत आपणांस सुचित करणेत येत आहे.
सबब उक्त नमुद प्रकरणाची तात्काळ विनाविलंब सखोल चौकशी करणेत येऊन केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल पुराव्याचे दस्तासह या कार्यालयास सादर करावा. विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन या स्तरावरील संदर्भ निर्गत होतील याची नोंद घ्यावी. असा लेखी आदेश विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेला आहे