Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
राजकीयशिर्डी

भावी केंद्रीय मंत्री संदाशिव लोखंडे यांनी सपत्नीक शिर्डीत मतदान

शिर्डी प्रतिनिधी/

sai nirman
जाहिरात

देशाच्या लोकशाहीला बळकट करणारी लोकसभा निवडणूक २०२४ च्या शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या निवडणुकीत  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील  १६ लाख ७२ हजार  २५० मतदार आपला भावी खासदार निवडणार आहे.

DN SPORTS

विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व सौ लोखंडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते  भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोदकर राहुल गोदकर उपस्थित होते
 देशभरात निवडणुकीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत असून सकाळी सकाळी मतदारांनी मतदानासाठी गर्दी करत आपल्या मतदानाचा हक्क बजावला ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी होत असल्याने लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला  मुस्लिम बांधवांनी सर्वच मतदान केंद्रांवर सकाळीच  आपल्या कुटुंबासह येत मतदान करण्यास सुरुवात केली आहे.

kamlakar


शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालय,आदर्श माध्यमिक विद्यालय आणि जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून शासनाच्या वतीने ठिकठिकाणी मार्गदर्शक भित्ती पत्रके लावत मतदारांना मतदाना विषयी जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.

तसेच हा लोकशाहीचा उत्सव असल्याने सुंदर फुग्यांची सजावट करत मतदारांना मतदान करतांना वातावरण सुंदर वाटावे अशी पूर्ण व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली आहे,

शिर्डी नगरपरिषद चे कर्मचारी सर्वत्र मतदान केंद्रांवर मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असून पोलिस प्रशासनाच्या वतीने देखील अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त  जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात आला.

सर्व मतदान केंद्रांवर लोक उन्हाच्या अगोदर मतदानासाठी गर्दी करताना दिसत होते यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button