Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
क्राईमशिर्डी

नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा

शिर्डीमध्ये साईभक्तांची वाढती गर्दी आणि भविष्यात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शिर्डी वाहतूक शाखेच्या वतीने रिक्षाचालकांचा कॉर्नर मेळावा नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यात रिक्षाचालकांनी नियमात राहूनच काम करावे, अन्यथा नियमांचा भंग करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या वेळी शिर्डी वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश येसेकर, सुजय विखे प्रणित भीमशक्ती आपे चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष चांगदेव जगताप, आकाश जगताप यांच्यासह शिर्डी शहरातील मोठ्या संख्येने रिक्षाचालक व मालक उपस्थित होते.


🚦 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक येसेकर म्हणाले की,
साईभक्तांची प्रचंड गर्दी आणि येणारा कुंभमेळा लक्षात घेता शिर्डी वाहतूक शाखेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.


❌ हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत
शिर्डीत कोणत्याही परिस्थितीत पुढील बाबी सहन केल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला—
अवैध प्रवासी वाहतूक
वाहतूक नियमांचा भंग
गणवेश परिधान न करणे
वाहनाची कागदपत्रे जवळ न ठेवणे
रस्त्यावर कुठेही वाहन उभे करणे
साईभक्तांशी अरेरावी व गैरवर्तन
मद्यप्राशन करून रिक्षा चालवणे
रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे


अशा प्रकारांवर थेट दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


🤝 रिक्षा संघटनेचा प्रशासनाला पाठिंबा
यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष चांगदेव जगताप यांनी बोलताना सांगितले की,
“शिर्डी पंचक्रोशीतील सर्व रिक्षाचालक वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करतील व पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील,” असे आश्वासन त्यांनी दिले.


👥 मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित
या कॉर्नर मेळाव्याला संजय जाधव, बंडू शेख, रूपेश रूपटक्के, सागर बत्तीशे, विकी कापसे, दीपक माळी, राकेश जगताप, पप्पू जगताप यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.


🚔 संदेश स्पष्ट – शिस्त ठेवा, भाविकांचा सन्मान करा
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत वाहतूक शिस्त, सुरक्षितता आणि साईभक्तांचा सन्मान राखणे ही प्रत्येक रिक्षाचालकाची जबाबदारी असून, नियम पाळणाऱ्यांना प्रशासनाचा पाठिंबा तर नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच, असा स्पष्ट संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button