
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आवारात रक्तदान आंदोलन शिवराष्ट्र सेना
वाडिया पार्क जलतरण तलाव मृत कै सागर कळसकर कुटुंबीयांच्या तप्त प्रतिक्रिया- श्री समीर खडके
अ.नगर – शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने गेली वर्षभरात जी ही काही सर्वसामान्यांसाठी आंदोलने झाली प्रशासकीय कारवायांचा विलंब पाहता जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवारात रक्तदान आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष नवसुपे यांनी सांगितले की, मनपा विविध डिपार्टमेंट जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विरोधात काही निवेदन देण्यात आली व त्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई धीम्या गतीने चालू होती .तिला गती आणण्याने करीता वाडीया पार्क जलतरण तलाव कै. सागर कळसकर कुटुंबीय यांना न्याय मिळवून देण्याकरिता शिवराष्ट्र सेनेने रक्तदान आंदोलन केले. तसेच केडगाव भिंगार सावेडी या उपनगरात राहणार्या महिलांना पतसंस्था तसेच सावकार यांनी व्याजाने पैसे देऊन चक्रवाढ पद्धतीने लाखो रुपयांची मागणी केली.असता त्यांना संरक्षण देण्याकरिता हे रक्तदान आंदोलन करण्यात आले .रक्तदान आंदोलन करण्याचा हेतू एकच प्रशासन व शासन रक्त शोषत आहे. मग आम्हीच रक्तदान करून तुम्हाला ती रक्त दान स्वरूपात देतो या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.
यानंतर समीर खडके यांनी आपल्या भाषणात सांगितले सागर कळसकर यांच्या कुटुंबीयांचा करता आधार हरपल्याने व प्रशासन क्रीडा अधिकारी यांनी साधी विचारपूसही केली नाही उलट पक्षी कै. सागर कळसकर यांच्या कुटुंबीयांना त्रास होईल असे वक्तव्य केले .प्रथमदर्शनी मृत्यू झाला त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने संरक्षण गार्ड व कामगार नव्हते ते असते तर कळस्कर यांचा जीव वाचला असता तसेच अनुप गांधी व सागर कळसकर यांच्या वडिलांनीही व पत्नीने तप्त अशा प्रतिक्रिया यावेळी दिल्या यानंतर ब्लड बँकेत जाऊन ब्लड देण्यात आले.
यावेळी महानगर अध्यक्ष समीर खडके अध्यक्ष राकेश सरवान, संघटन मंत्री संतोष त्रिंबके तसेच अल्पसंख्याकांकडे प्रमुख अनुप गांधी शहराध्यक्ष जय बोरा महिला आघाडी प्रमुख सुनिता चौहान केडगांव आघाडी प्रमुख मंगल बरगडे ,पुनम शिंदे ,सौ. पैठणकर सौ.सावत आदी यावेळी उपस्थित होते.
कृपया प्रसिद्धीसाठी आपला
शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने गेली वर्षभरात जी ही काही सर्वसामान्यांसाठी आंदोलने झाली प्रशासकीय कारवायांचा विलंब पाहता जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवारात रक्तदान आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष नवसुपे, समीर खडके, समीर खडके, राकेश सरवान, संतोष त्रिंबके तसेच अनुप गांधी, जय बोरा, सुनिता चौहान, मंगल बरगडे, पुनम शिंदे, सौ. पैठणकर सौ.सावत आदी.