शिर्डी, दि.७ —
शिर्डीतील सोसायटीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमलाकर कोते यांनी साईबाबा संस्थान आणि स्थानिक राजकारणातील अलीकडच्या घडामोडींवर थेट, जिव्हाळ्याने आणि टोचून भाष्य केले.

“दादा, तुम्ही साईबाबांना प्रार्थना करा की संस्थानमधील हे सर्व जण कायमचे सभासद व्हावेत. तुम्ही केलेली प्रार्थना कधी व्यर्थ जात नाही, हे माझ्या अनुभवावरून सांगतो,” असं त्यांनी सुजय विखे यांना सांगितलं.
💬 “कर्ज काढलं, फ्लेक्स लावले… पण स्वप्नावर पाणी फिरलं”
नेत्याबद्दल वेदना व्यक्त करताना कोते भावनिक झाले.
ते म्हणाले, “आमच्या लोकांनी किती खर्च केला! कुणी कर्ज काढलं, कुणी बोर्ड लावले, फ्लेक्स लावले — पण भावी नगराध्यक्ष होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. त्यांचं दुःख सांगावं तरी कुणाला?”
राजकारणात अति घाई संकटात नेते, असा इशाराही कोते त्यांनी दिला.
🗣️ “शिर्डीकर सुज्ञ आहेत — सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालतात”
कोते म्हणाले, “साईबाबांनी शिकवलं — ‘सबका मालिक एकच’. शिर्डीकर हे सुज्ञ लोक आहेत. त्यांनी नेहमी सर्व जाती-धर्मांना बरोबर घेतलं. आरक्षण नसतानाही शिर्डीकरांनी योग्य व्यक्तींना पदं दिली.”
ते पुढे म्हणाले, “शिर्डीच्या जडणघडणीत सर्व समाजांचा हात आहे, आणि साईभक्ती हेच या शहराचं वैशिष्ट्य आहे.”
🙏 “गाडीलकर साहेब साईभक्त आणि पारदर्शी अधिकारी”
साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याबद्दल कोते यांनी विशेष कौतुक केले.
“गाडीलकर साहेबांसारखा सुज्ञ आणि साईभक्त अधिकारी दुर्मिळ आहे. ते कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. जे खोटे आहेत त्यांना बाजूला ठेवतात, आणि जे काम करतात त्यांना प्रोत्साहन देतात.”
कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “आपण साईबाबांच्या जीवावर खातो, त्यामुळे साईबाबांचा अपमान होऊ देऊ नका.”
🌸 “साईबाबांनीच तुम्हाला बोलावलं – तुमच्या हातूनच भक्तांची सेवा घडणार”
आपले विचार संपवताना कोते म्हणाले,
“साईबाबांनी तुम्हाला या संस्थेत बोलावलंय भक्त आणि ग्रामस्थांची सेवा व्हावी म्हणूनच गाडिलकर साहेब
ज्या झाडाला फळं लागतात म्हणून त्यांना दगड मारतात — पण आपण आपलं काम थांबवायचं नाही. साईबाबांच्या कृपेने तुमच्या हातून चांगलं कार्य घडो, हीच साईचरणी प्रार्थना.”
📰 — साईदर्शन न्यूज प्रतिनिधी, शिर्डी