Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरक्राईम

आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या आश्रमात शुक्रवारी रात्री महिला कीर्तनकारची आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महाराज ह.भ.प. संगीताताई पवार यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळखळ उडाली आहे. महिला कीर्तनकाराची दडगाने ठेचून हत्या होणं, ही गंभीर बाब आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे.

ह.भ.प. संगीताताई महाराज यांची यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समजताच वैजापूर आणि संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

संगीताताई महाराज यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैजापूर पोलिसांकडून हत्येचा तपास करण्यात येत आहे. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

श्वानपथक घटनास्थळी पोहचले आहे. ह.भ.प. संगीताताई महाराज यांची हत्या का केली? कुणी केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून आश्रमात चौकशी कऱण्यात येत आहे. श्वनपथकाकडून पुरावे शोधण्याचे काम करण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अज्ञाताचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button