
राहाता (प्रतिनिधी):
एकेकाळी ‘पेरू नगरी’ म्हणून राज्यभर गाजलेल्या राहात्याची अर्थव्यवस्था आज धुळीस मिळाली आहे. पेरूला दर नाही, खर्च भरमसाठ आणि शेतकऱ्यांचा घाम फुकट गेला! बँकांचे नोटीस धाडणे सुरू, सावकारांच्या धमक्या वाढल्या — शेतकरी कर्जात बुडाला, पण सरकार गप्प!
राहात्याची बाजारपेठ जी पूर्वी शेतमालाने गजबजलेली असायची, आज तिथं सुनसान वातावरण आहे. दुकानदार डोळ्यात पाणी घेऊन म्हणतात — “लोकांकडे खर्च करायला पैसेच राहिले नाहीत भाऊ!”
💬 “कुठं दडलाय राहात्याचा स्वाभिमान?” — रामनाथ सदाफळ यांचा थेट सवाल!
“शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे कोणी पाहत नाही. पिकांना दर नाही, कर्जमाफी नाही, आणि सरकारकडून फक्त आश्वासने!
आम्ही शेतकरी जगासाठी अन्न उगवतो, पण आज आमच्याकडेच भाकरी नाही. मग आम्ही गप्प का बसायचं?” असा जळजळीत सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ सदाफळ यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे म्हटलं —
“राहात्याचं नाव मॉडेल सिटी ठेवलं, पण या शहराचा पाया असलेल्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही गप्प का हो, कुठ दडलाय आपला स्वाभिमान?”
🚜 “खर्च आमचा, फायदा कोणाचा?” — शेतकऱ्यांचा आक्रोश
“पेरूची लागवड केली की एका एकराला तीस हजार खर्च येतो. दर मात्र दहा रुपये किलो! वाहतूक, मजुरी, कीटकनाशकं, सगळं महागलं. आता आम्ही शेतीत राहायचं तरी कसं?” असा सवाल शेतकरी बांधवांनी केलाय.
अनेक शेतकरी बँकांच्या दारात चकरा मारत आहेत. काहींनी शेती सोडून मजुरीकडे वळायचा निर्णय घेतलाय — हीच खरी राहात्याची शोकांतिका आहे!
🕳️ राहात्याची बाजारपेठ ओस, शेतकऱ्यांचे डोळे ओले…
पूर्वी रोज लाखोंचा व्यापार असलेल्या राहात्याच्या बाजारात आता शुकशुकाट आहे.
रस्त्यांवर रिकामे ट्रॅक्टर, न विकलेले पेरू आणि शेतकऱ्यांच्या नजरेत हतबलतेची छटा — हेच वास्तव!
🙏 “तरीही आम्ही गप्प का हो?”
हा प्रश्न आता फक्त रामनाथ सदाफळ यांचा नाही — तो प्रत्येक राहात्याच्या शेतकऱ्याच्या मनातला आवाज आहे.
राहाता आज आर्थिक वादळात उभं आहे…
आणि तरीही आम्ही गप्प आहोत का?
कुठ दडलाय आपला स्वाभिमान…?
[13:23, 5/11/2025] Jitesh Lokchandani: मॉडेल सिटी राहत्यात शेतकरी उध्वस्त — पेरूची नगरी आज अश्रूंनी भिजली!कुठं दडलाय राहात्याचा स्वाभिमान?” — रामनाथ सदाफळ