Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरक्राईम

निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प्रतिमा आता दीपक सरोदे सुधारतील का?

राहता शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, हाणामाऱ्या, अवैध धंदे आणि गुन्हेगारी घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना अखेर पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेत राहता पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची तातडीने बदली केली आहे. त्यांच्या जागी आता दबंग आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पदभार स्वीकारला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर अपेक्षित वचक राहिला नसल्याची भावना जनतेमध्ये तीव्र झाली होती. शहरातील विविध भागात वाढलेले अवैध व्यवसाय, खुलेआम फिरणारे गुन्हेगार आणि वाढती दादागिरी यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत संताप व्यक्त केला होता. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेच्या रोषाची दखल घेत ही बदली केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.


नवीन पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्यासमोर आता राहता शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान उभे आहे. गुन्हेगारांवर पुन्हा पोलिसांचा दरारा निर्माण करणे, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे, रात्रीची गस्त वाढवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या गोष्टींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या स्वागतावेळी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करत शहर गुन्हेगारीमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आता सरोदे यांच्या नेतृत्वाखाली राहता शहरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होणार का, गुन्हेगारांवर लगाम बसणार का आणि सर्वसामान्य नागरिक निर्धास्तपणे जगू शकणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक; राहता शहराची बिघडलेली प्रतिमा आता दीपक सरोदे सुधारतील का?
▪️ अवैध धंदे, वाढती दादागिरी आणि पोलिसांचा कमी झालेला धाक यामुळे राहता शहराची मान खाली गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. आता नूतन पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वाखाली राहता शहर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गावर येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button