Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरक्राईम

लाचखोरांची नांगी ठेचली विज चोरीचा खोटा बागुलबुवा-₹1.25 लाखांची डील-₹50 हजारातच ACBचा सापळा

अहिल्यानगर | विशेष क्राईम रिपोर्ट –
जनतेची सेवा करण्यासाठी बसवलेली सरकारी यंत्रणा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात लुटीचे हत्यार बनल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात उघडकीस आला आहे. विज चोरीचा खोटा बागुलबुवा उभा करून सामान्य नागरिकाला भीतीच्या गर्तेत ढकलत लाखोंची लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरणच्या सहायक अभियंता व वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
हि कारवाई केवळ दोन अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नसून, महावितरणमधील लाचखोरीच्या साखळीवर प्रकाश टाकणारी ठरत आहे.
⚡ खोटा विज चोरीचा ठपका; चार लाखांच्या दंडाची धमकी
तक्रारदार बाबासाहेब हराळ यांच्या पत्नीच्या नावावर मंगलमुर्ती अॅक्वा हा पाण्याचा प्लॉट असून, त्याठिकाणी कमर्शियल व घरगुती असे दोन्ही स्वतंत्र वीजमीटर अधिकृतरीत्या बसवलेले आहेत.
मात्र दि. 22 डिसेंबर 2025 रोजी सहायक अभियंता किरण गजेंद्र मोरे व वायरमन शिवकुमार आचारी यांनी घरी येत मिटर तपासणीच्या नावाखाली,
“तुम्ही वीज चोरी करता, तुमच्यावर कारवाई होईल, चार लाख रुपयांचा दंड बसेल”
अशी थेट धमकी दिली. याच ठिकाणी थकबाकी नसताना देखील ₹36,000 बिल भरण्याचा दबाव टाकण्यात आला.
💰 “दंड नको असेल तर दोन लाख द्या” – उघड उघड सौदा
दि. 25 डिसेंबर 2025 रोजी हेच अधिकारी पुन्हा घरी आले आणि
“तुम्ही आमच्या ऑफिसला आलाच नाहीत, प्रकरण सीरियस आहे. चार लाखांचा दंड बसेल. मात्र दोन लाख दिलेत तर आम्ही चोरीची केस करणार नाही”
अशी थेट लाचेची मागणी करण्यात आली.
इथून पुढे हा प्रकार सरकारी तपास नव्हे तर सरळ खंडणी असल्याचे स्पष्ट झाले.
🪤 ACBकडे तक्रार; सापळ्यात अडकले लाचखोर
त्रस्त नागरिकाने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
दि. 31 डिसेंबर 2025 रोजी नेवासा फाटा येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी अभियंता मोरे यांनी पंचासमक्ष ₹1.25 लाखात तडजोड ठरवली.
दि. 01 जानेवारी 2026 रोजी
📍 देवरे हॉस्पिटलजवळ, नेवासा फाटा
येथे सापळा रचण्यात आला.
👉 अभियंता मोरे यांच्या सांगण्यावरून वायरमन शिवकुमार आचारी याने
👉 ₹50,000 (पहिला हप्ता) स्वीकारताच
👉 ACB पथकाने दोघांनाही रंगेहात अटक केली.
⚖️ सरकारी पदाचा गैरवापर; भ्रष्टाचाराचा गुन्हा
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाणे गुन्हा क्र. 03/2026 अन्वये
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सरकारी पद, अधिकार आणि नागरिकांच्या भीतीचा गैरवापर करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याचा गंभीर गुन्हा या अधिकाऱ्यांनी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
👮 ACBची धडक कारवाई; अधिकाऱ्यांची धडकी भरली
ही कारवाई
👮‍♀️ पो.नि. छाया कडू देवरे
यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
मार्गदर्शन :
अजित त्रिपुटे (DySP, ACB अहिल्यानगर)
भारत तांगडे (SP, ACB नाशिक परिक्षेत्र)
माधव रेड्डी, सुनील दोरगे (Addl. SP)
या कारवाईमुळे महावितरण व इतर शासकीय खात्यांतील लाचखोरांची झोप उडाली आहे.
🚨 जनतेला इशारा, लाचखोरांना थेट संदेश
हि घटना केवळ एक कारवाई नसून
👉 “लाच मागणाऱ्यांना माफी नाही”
हा ACBचा स्पष्ट इशारा आहे.
कोणताही अधिकारी लाच मागत असल्यास नागरिकांनी गप्प न बसता थेट ACBकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button