Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
अ.नगरराजकीय

ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र
राज्‍यातील जनतेने मोठ्या विश्‍वासाने महायुतीला पाठबळ दिले, जो विश्वास दाखवला तो विश्वास कामातून सिध्‍द करुन दाखविण्‍याचा भविष्‍यात निश्चित प्रयत्‍न होईल. या जिल्‍ह्याने नेहमीच पाण्‍यासाठी संघर्ष केला. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून शेतक-यांसह सामान्‍य माणसाच्‍याही असलेल्‍या अपेक्षा पुर्ण करण्‍याचा माझा यापुढे प्रयत्‍न असणार आहे. दुष्‍काळमुक्‍त जिल्‍हा करणे हेच आपले उदिष्ट असेल अशी ग्‍वाही जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जलसंपदा खात्याच्या मंत्री पदाचा कार्यभार आल्‍यानंतर ना.विखे यांचे प्रथमच मतदार संघात आगमन झाले. जिल्‍ह्यातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉग्रेस आणि मित्रपक्षांच्‍या वतीने त्‍यांचा सोमवारी लोणी येथे सत्‍कार करण्‍यात आला. जनसेवा संपर्क कार्यालयात ना.विखे यांना शुभेच्‍छा देण्‍यासाठी सर्वांनीच मोठी गर्दी केली होती. सर्वांच्‍या सत्‍काराचा स्विकार केला. नामदार विखे पाटील स्वतः कार्यकर्त्यांमध्ये उभे राहून सत्कार स्वीकारत होते.

तसेच प्रत्येका बरोबर फोटो काढत होते. प्रत्येकाचा सत्कार, शुभेच्छा, अभिनंदन स्वीकारत होते. त्याचबरोबर मतदार संघातील व जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मनमोकळे व दिलखुलासपणे चर्चाही करत होते.
राहता तालुक्यातील लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात ना.विखे यांचे अभिनंदन करण्‍यासाठी अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासह राज्‍यातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि प्रशासनातील आधिकारी उपस्थित होते.

सर्वांच्‍या सत्‍काराचा आणि शुभेच्‍छांचा स्विकार करुन, मंत्री विखे यांनी सर्वांशी संवाद साधला. जेष्‍ठनेते माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, आ.किरण लहामटे, जलसंपदा विभागाचे नाशिक विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सौ.सोनल शहाणे, मुळा लाभक्षेत्राच्‍या कार्यकारी आधिकारी सौ.सायली पाटील, निळवंडे प्रकल्‍पाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदिप हा

लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हारदे यांच्‍यासह संभाजीनगर येथील गोदावरी लाभक्षेत्राशी निगडीत सर्व शाखांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तसेच शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक गावातील पदाधिकारी कार्यकर्ते येथे शेतकऱ्यांसाठी आले होते. जिल्ह्यातीलही अधिकारी, कार्यकर्ते आले होते.


यावेळी महायुती सरकारने दिलेली सर्व आश्‍वासनं पुर्ण करण्‍याची हमी ही नव्‍याने स्‍थापन झालेल्‍या मंत्रीमंडळाकडून निश्चित होईल अशी ग्‍वाही देवून मंत्री विखे म्‍हणाले की, महायुती सरकारला सर्वात मोठा असा जनाधार मिळाला आहे. याचे एकमेव कारण, युती सरकारने ज्‍या योजना जाहिर केल्‍या.

त्‍याची अंमलबजावणी यशस्‍वीपणे झाली. महायुती सरकारने आपल्‍या कामातून लोकांना नवा विश्‍वास दिला होता. त्‍याच विश्‍वासाचे फलीत हे निकालाच्‍या माध्‍यमातून दिसून आले. भविष्‍यातही हाच विश्‍वास कामाच्‍या आणि योजनांच्‍या माध्‍यमातून कृतीत उतरविण्‍याचा प्रयत्‍न महायुती सरकार निश्चित करेल अशी ग्‍वाही नामदार राधाकृष्ण विखे यांनी यावेळी दिली.जलसंपदा विभागातून काम करण्‍याची मोठी संधी आपल्‍याला मिळाली आहे.

गोदावरी आणि कृष्‍णा हे सर्वात मोठे असे खोरे आहे. प्रत्‍येक माणसासाठी पाणी हा महत्‍वाचा विषय आहे. लाभक्षेत्रातील शेतक-यांसह जनतेच्‍याही असलेल्‍या अपेक्षा या भविष्‍यात आपल्‍याला पुर्ण करायच्‍या आहेत. कारण आपल्‍या भागाने पाण्‍यासाठी सदैव संघर्ष केला. नदीजोड प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून आता दुष्‍काळमुक्‍त जिल्‍हा करणे हेच आपले उदिष्‍ट असल्‍याचे त्‍यांनी शेवटी आवर्जुन सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button