Letest News
EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली
क्राईमशिर्डी

EXCLUSIVE: भोंदू ‘कॅप्टन’चा आणखी एक कारनामा? साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याची संशयास्पद आत्महत्या

शिर्डी | प्रतिनिधी (दैनिक साई दर्शन विशेष मालिका – भाग 1)
शिर्डीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, साईबाबा संस्थानशी संबंधित एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे गंभीर कट असल्याची शक्यता समोर येत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात भोंदू ‘कॅप्टन खरात’चाच  हस्तक्षेप असल्याचे पुढे येत असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहाता तालुक्यातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या साई संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला ही आत्महत्या वैयक्तिक कारणांमुळे झाल्याचे मानले जात होते. मात्र, आता या घटनेमागे दीर्घकाळ चाललेला मानसिक छळ आणि दबाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर सतत मानसिक दबाव आणला जात होता. त्याला नोकरी गमावण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, तसेच विविध मार्गांनी त्रास देण्यात येत होता. या सर्व प्रकारामुळे तो प्रचंड तणावाखाली होता.
या सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, भोंदू ‘कॅप्टन खरात’ने कथितरित्या या व्यक्तीवर संस्थानच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून दबाव आणल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचीही चर्चा असून, त्यामुळे ही आत्महत्या नसून “हत्या” असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीमध्येही काही महत्त्वाचे उल्लेख असल्याची माहिती समोर येत असून, पोलीसांनी ती जप्त केली आहे. मात्र, या चिठ्ठीतील मजकूर अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही.


आत्महत्या की दबावाखाली घेतलेला टोकाचा निर्णय?
या प्रकरणात मानसिक छळ आणि बाहेरील दबाव यामुळे परिस्थिती गंभीर बनल्याचे दिसत आहे.
‘कॅप्टन खरात’ पुन्हा चर्चेत; जुन्या प्रकरणांशी धागेदोरे?
शिर्डी परिसरात आधीही वादग्रस्त ठरलेले ‘कॅप्टन खरात’ हे नाव पुन्हा समोर येत असल्याने, या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा रंगली आहे.
पोलिसांकडे तक्रार; तपासाची दिशा महत्त्वाची
या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणात खरे सत्य बाहेर येणार का? हा प्रश्न कायम आहे.
उद्या भाग 2 मध्ये:
मृत व्यक्ती कोण?
फिर्यादीचे धक्कादायक आरोप
‘कॅप्टन खरात’चा नेमका रोल काय?
फक्त दैनिक साई दर्शनवर…

धक्कादायक वळण; ‘कॅप्टन’ कनेक्शनचा संशय या प्रकरणात धक्कादायक वळण! मयत व्यक्तीने लिहून ठेवलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये साईबाबा संस्थानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्याने प्रकरण दडपण्यासाठी मोठ्या आर्थिक तोडजोडी केल्याचीही चर्चा जोर धरत आहे.
‘कॅप्टन खरात’ कनेक्शनचा संशय
या प्रकरणात भोंदू ‘कॅप्टन खरात’ने संबंधित अधिकाऱ्याला हाताशी धरून मयत व्यक्तीवर मानसिक दबाव टाकत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक दाव्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

दैनिक साई दर्शनचा मोठा प्रयत्न
या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी दैनिक साई दर्शनकडून संबंधित आत्महत्या केलेल्या मयताच्या कुटुंबियांकडून माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही महत्त्वाचा पुरावा हाती लागल्यानंतर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
कायदेशीर कारवाईची तयारी संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पुरावे स्पष्ट आढळले, तर त्या अधिकाऱ्यासह इतर संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यासाठी दैनिक साई दर्शन पुढाकार घेणार असल्याचे समजते.

सर्वप्रथम ‘दैनिक साई दर्शन’ची धडक बातमी!
मयत व्यक्तीच्या आत्महत्येची घटना सन 2022 मध्ये सर्वप्रथम दैनिक साई दर्शननेच उघडकीस आणली होती. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला नव्याने धक्कादायक वळण मिळत असून, जुन्या घटनेतील अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button