Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
Blog

१४ दिवस उलटले तरी सचिन गिधेचा तपास अंधारातअपहरणानंतर काही बरे–वाईट केल्याची परिसरात चर्चा

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी येथील हॉलीडे पार्क परिसरात राहणारे सचिन कल्याणराव गिधे (वय अंदाजे ३०) हे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांच्या अपहरण प्रकरणाचा तपास अद्यापही निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाही. यामुळे गिधे कुटुंबीयांसह परिसरात तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
सचिन गिधे यांची पत्नी श्रद्धा सचिन गिधे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी फिर्यादीत, प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे व दिपक अंबादास पोकळे यांनी अज्ञात कारणासाठी पतीचे अपहरण केल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे.
📞 धमकीचा कॉल आणि शेवटचा फोन
दि. १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी कामावर निघालेले सचिन रात्री घरी न परतल्याने संशय गडद झाला. रात्री सुमारे ८ वाजता प्रविण वाघमारे याचा धमकीवजा फोन आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
रात्री १०:३० वाजता सचिन गिधे यांनी स्वतः फोन करून “प्रविण वाघमारे व दिपक पोकळे मला साकुरी शिव येथून घेऊन जात आहेत, माझ्या जीवाला काही बरे–वाईट झाल्यास हेच दोघे जबाबदार असतील” असे सांगितल्यानंतर फोन बंद झाला. त्यानंतर आजपर्यंत त्यांचा मोबाईल सुरू झालेला नाही.
⚠️ अधिकृत सूत्रांकडून गंभीर माहिती
दरम्यान, अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांनी सचिन गिधे यांचे अपहरण केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. याशिवाय परिसरात “सचिनचे काही बरे–वाईट करण्यात आले असावे” अशी भीतीदायक चर्चा सुरू आहे.
या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, सचिनसोबत अपहरण झालेल्या आणखी एका युवकाला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली होती, व त्या संदर्भात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, त्या घटनेचा आणि सचिन गिधे बेपत्ता प्रकरणाचा परस्पर संबंध असूनही तपासात ठोस प्रगती झालेली दिसत नाही.
❗ कुटुंबियांचा आक्रोश – “आता तरी तपासाला गती द्या”
१४ दिवस उलटूनही तपास अंधारात असल्याने गिधे कुटुंबियांचा संयम सुटत चालला आहे.
“आमच्या घरचा कर्ता पुरुष बेपत्ता आहे, आम्हाला केवळ आश्वासनं नकोत, दोषींवर तात्काळ कारवाई हवी” अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
👮 पोलिसांपुढे कठीण प्रश्न
शेवटच्या कॉलमधील नावे स्पष्ट असूनही अटक का नाही?
दुसऱ्या अपहरण व मारहाण प्रकरणाशी जोड का लावली जात नाही?
मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही, कॉल डिटेल्सचा तपास कुठपर्यंत?
या गंभीर प्रश्नांमुळे शिर्डी व राहाता पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
➡️ गिधे कुटुंबियांची एकच मागणी — “सचिन गिधे जिवंत असो वा नसो, सत्य समोर आणा आणि दोषींना तात्काळ अटक करा.”

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button