Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
शिर्डी

शिर्डी गॅझेटीयर अनटोल्ड स्टोरिज साईं आगमन ते समाधी शताब्दी या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

साईबाबांच्या जीवनाशी निवडीत घटना, प्रसंग, व्यक्ती यांचा सर्वांगिण वेध घेणारा ‘शिर्डी गॅझेटीयर’ हा ग्रंथ सखोल संशोधनाशिवाय साकार होणे शक्य नव्हता. हा ग्रंथ साकार होण्यासाठी लेखक प्रमोद आहेर यांनी घेतलेल्या कष्टाला सलाम आहे. साईबाबांविषयींच्या अशा अनेक गोष्टी, घटना व माहितीचा खजिना ‘शिर्डी गॅझेटीयर” पुस्तकाच्या रूपाने आपल्याला उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन लेखिका पद्मश्री खासदार सुधा मूर्ती यांनी केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या ग्रंथाच्या विविध प्रादेशिक भाषेतील आवृत्त्याही लवकर प्रकाशित झाल्या पाहिजेत. अशी अपेक्षाही मूर्ती यांनी यावेळी व्यक्त केली. साईसमाधी मंदिरालगत असलेल्या शताब्दी मंडपात ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर लिखित व डॉ. दीपाली जाजू यांनी अनुवादित केलेल्या ‘शिर्डी गॅझेटीयर (अनटोल्ड स्टोरिज साई आगमन ते समाधी शताब्दी या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पद्मश्री खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी सिंग हे हे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, साईबाबा संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रांताधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.

उपसभापती हरिवंशजी म्हणाले, साईबाबांच्या जीवनावर चित्रपट, माहितीपट नाटक व पुस्तक निर्मिती करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यांना “शिर्डी गॅझेटीयर” पुस्तकाला टाळून पुढे जाणे शक्य होणार एवढा हा ग्रंथ परिपूर्ण झाला आहे. संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. देशाची ताकद अध्यात्मात आहे आणि या अध्यात्माचे चमकते हिरे साईबाबा आहेत. श्रध्दा व सबुरीचा मंत्र साईबाबांनी जगला दिला आहे. महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे.

पुस्तकाचे लेखक प्रमोद आहेर म्हणाले, लेखिका सुधा मूर्ती यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तो माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. शिर्डीतील ४७ भाग्यवंत कुटुंबांना साईबाबांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. या कुटुंबातील महत्त्वाची व्यक्तींचे कार्य, घटना यांचा पुस्तकात उल्लेख आला आहे. पुढील पिढीसाठी हा ग्रंथ बखर ठरणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button