Letest News
कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह
अ.नगरशिर्डी

जय साई फाउंडेशनतर्फे श्री साईबाबा हॉस्पिटलला ₹२१ लाखांच्या वैद्यकीय उपकरणांची देणगी

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या श्री साईबाबांच्या शिकवणीतूनच श्री साईबाबा संस्थानामार्फत कार्यान्वित श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाते. अनेक साईभक्त आपल्या श्रद्धेच्या भावनेतून संस्थानाच्या विविध उपक्रमांसाठी देणगी स्वरूपात योगदान देतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अशाच सेवाभावी वृत्तीने गांधीधाम, गुजरात येथील जय साई फाउंडेशनच्या वतीने साईभक्त हसीजा राजीव कुमार, हसिजा मनु, मोहीत जैडका आणि व्हिंकी लुंबा यांनी श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी ₹२१ लाख मूल्याचे TMT MACHINE आणि GIESTER SURGICAL INSTRUMENT SET देणगी स्वरूपात प्रदान केले.


संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी या देणगीदार साईभक्तांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
सदर उपकरणांचे लोकार्पण व पूजन साईभक्त हसीजा राजीव कुमार, हसिजा मनु, मोहीत जैडका आणि व्हिंकी लुंबा यांच्या हस्ते तसेच श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.


या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल ,श्री साईबाबा संस्थान या अमूल्य योगदानाबद्दल जय साई फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानते आणि अशा सेवाभावी उपक्रमांमुळे साईबाबांची शिकवण अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button