Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
अ.नगरराजकीय

खा. सदाशिव लोखंडे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या भष्टाचाराचीचौकशी करा  डॉ. भारत करडक

शिर्डी प्रतिनिधी/

sai nirman
जाहिरात

खासदार सदाशिव लोखंडे यांचा 16 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाने राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजने अंतर्गत खासदार लोखंडे यांच्या खेमानंद दूध आणि कृषी प्रोडूसर  कंपनी  नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई, या संस्थेने नियमांना बगल देऊन ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज घेताना १६ कोटी रुपये अनुदान मिळवले आहे. जागतिक बँक, नाबार्ड,, स्मार्ट, पोकरा आदि केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे उत्पादक कंपन्यांना अनुदान दिले जाते.

DN SPORTS

सदर प्रकारआणि जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झालेला असूनही त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. त्यामुळे याची वसूली करावी अशा मागणीचे पत्र स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.सदर शेतकरी उत्पादक कंपनीला दिलेले अनुदान व्याजासह वसूल करण्यात यावे,

kamlakar

तसेच या पैशाचा वापर करून अन्य मालमत्ता विकत घेतल्या असतील तर त्याची सक्त वसुली संचालना द्वारे चौकशी करण्यात यावी. यासह मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या व्हेंचर कॅपिटल फंड ची वसुली करण्यात यावी, तसेच खा. सदाशिव लोखंडे यांनी अन्य विभागातूनही पदाचा गैरवापर करत सरकारी निधी आणि अनुदान लाटल्याची अन्य प्रकरणे आहेत काय? याची सखोल चौकशी व्हावी,

अशी मागणी पुन्हा देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांचेकडे करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच शिर्डी शहरातील शिवसेनेच्या एका शहराध्यक्षाच्या नावावर खासदार लोखंडे साहेबांचा किती प्रॉपर्टयामध्ये सहभाग आहे याची चौकशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून व्हावी तसेच श्री साईबाबा संस्थान मधील तूप घोटाळ्याची पण चौकशी व्हावी जेणेकरून संसदेमध्ये चारित्र्यवान खासदार जनतेला पाठवता येईल 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button