Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
राजकीय

मुजोरी करणाऱ्या निवडणुक अधिकारी यांच्या विरोधात पत्रकार किसन पवार यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल

घारी येथील किसन विठ्ठल पवार घारी येथील रहिवाशी व मतदार असून आज रोजी लोकसभेचे मतदान करण्यासाठी घारी येथील मतदान केंद्रावर गेले असता प्रत्यक्षात मतदान करते वेळी ईव्हीएम मशीनचे बटन दाबले असता ईव्हीएम मशीन मधून मतदान झाल्याचा बीप आवाज ऐकू न आल्याने त्यावर तिथे उपस्थित अधिकारी यांना सांगितले असता त्यावर ते म्हणाले की तुमचे मतदान झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

परंतु मतदाराला ईव्हीएम मशीन मधून मतदान पूर्ण झाल्यानंतर चा बीप आवाज मतदाराला ऐकू आल्यानंतर त्याचे मतदान पूर्ण झाले आहे असे समजावे असे निवडणूक आयोगाने जी मतदान प्रक्रिया सांगितली आहे त्यातून मला ज्ञात आहे. त्यावर पवार यांनी सेक्टर अधिकारी व्ही.बी.शिंदे यांना विनंती केली की येथील उपस्थित माणसांचा आवाज कमी करा, मतदान केंद्रात शांतता राखा म्हणजे मतदाराला ईव्हीएम चा मतदान पूर्ण झाल्यानंतर बीप आवाज ऐकू येईल मात्र तिथे उपस्थित असलेले सेक्टर अधिकारी व्ही.बी.शिंदे यांनी सदर गोष्टीची दखल घेतली नाही.

kamlakar

त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले., त्यांच्यासोबत असणारी आणखी अधिकारी, केंद्रप्रमुख चहा आणणारे अशा अनेक लोकांची गर्दी वाढल्यामुळे मोठा गडबड गोंधळ चालू असल्यामुळे ईव्हीएम मशीनचा बीप आवाज मतदाराला ऐकू येत नव्हता पवार यांनाही तो ऐकू आला नाही म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असलेले सेक्टर ऑफिसर व्ही.बी.शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली मात्र त्यांनी त्यावर उपाययोजना करण्याऐवजी एक मतदार म्हणून माझे म्हणणे ऐकून घेतले नाही व माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा व्यवहार विनयशील नव्हता.

ही बाब अतिशय निंदनीय आहे. मतदान केंद्रामध्ये मतदाराला त्याने मतदान केल्याची पोहचपावती म्हणून व्हीव्हीपॅट मशीन मध्ये निघणारी पोहच व बीप आवाज या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्याची मतदान झाल्याची खात्री होणार आहे मात्र आपले सेक्टर अधिकारी व्ही.बी.शिंदे याबाबतीत मतदारांचे समाधान करण्यात असमर्थ ठरले आहेत

पवार यांनी केलेल्या सूचनांचा त्यांनी विचार केला नाही त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडलेला आहे व त्यांनी मतदाराला तुच्छ लेखून मतदार काहीतरी भंपक गोष्टी सांगत आहे असे त्यांनी बोलून दाखवले पवार यांनी त्यांना वारंवार विनंती केली मात्र त्यांनी पवार यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तरी ह्या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी करून कारवाई होण्यास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button