श्रीरामपूर पोलिसांची कारवाई कत्तलीसाठी आणलेल्या ८ गौवंशिय जनावरांना जीवदान.
श्रीरामपूर : शहरात असलेल्या वार्ड नंबर २, सुभेदार वस्ती परिसरात. कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या गौवंशिय जनावरांची माहिती मिळताच, शहर पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेच्या सुमार छापा टाकून. अंदाजे साडे ५ लाख रुपये किमतीच्या, ८ गौवंशिय जनावरांची सुटका केली असून. या प्रकरणी अजमत कुरेशी राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर २, याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात, महाराष्ट्र प्राणी सरक्षण(सुधारणा) अधिनियम १९९५ चे सुधारित कायदा सन २०१५ चे कलम ५, ५(ब),९ सह ,प्राण्याना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबात अधिनियम १९६० चे कलम ११(च),११ (ज) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.

पोलीस आल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाल्याने. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे ,हेडकोन्स्टबल शफिक शेख, पोलीस नाईक करखीले, मच्छिंद्र शेलार,पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,रमीजराजा अत्तर,धनंजय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी यशस्वी रित्या पारपडली.