
शिर्डी प्रतिनिधी
भारत सरकार क्रिडा विभागाच्या निर्देशानुसार “फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत दिनांक २४/०८/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे सायक्लोथॉन स्पर्धा हि DSP चौक – SBI चौक – पुणे बस स्टॅण्ड सक्कर चौक न्यु टिळक रोड नेप्ती नाका दिल्ली गेट-बालिकाश्रम रोड – नायरा पेट्रोलपंप प्रेमदान चौक पत्रकार चौक तारकपुर DSP चौक अशी १५ कि.मी. गटामध्ये घेण्यात येणार आहे.
तरी सर्व सायकलपटु यांना विनंती करण्यात येते की, ज्याना सदरच्या सायक्लोथॉन मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी दिनांक २४/०८/२०२५ रोजी सकाळी ६.३० वा. पोलीस अधीक्षक कार्यालय, DSP चौक छत्रपती संभाजी नगर रोड, अहिल्यानगर या ठिकाणी स्वतःची सायकल, हेल्मेट व योग्य त्या साहित्यासह हजर राहावे, सदर सायक्लोथॉन मध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धेकांना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याने जिल्हयातील जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा.
सदर उपक्रमाचा हेतु पोलीस दल व नागरिकांमध्ये “फिटनेस की डोस आधा घंटा रोज ” या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.म्हणून जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे