Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती

राहाता : राहाता तहसीलदार अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या वतीने त्यांचा सत्कार करून भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या पदोन्नतीचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय मंडळी एकत्र आल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
तहसीलदार म्हणून कार्यरत असताना अमोल मोरे यांनी आपल्या कामाला शंभर टक्के न्याय देत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. आपल्या दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जात, पक्ष अथवा राजकीय भूमिका न पाहता न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळेच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तालुक्यातील सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिस्तीच्या अधिकाऱ्याची सर्वपक्षीयांकडून पाठ थोपटली!
मोरे हे कडक शिस्तीचे अधिकारी असले तरी मनाने अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील अधिकारी आहेत, अशी भावना यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केली. प्रशासकीय कामकाजात त्यांनी कोणतीही तडजोड न करता नियमांना प्राधान्य दिले. त्याचबरोबर सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेत त्याला योग्य मार्गदर्शन आणि न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली.


राहाता तालुक्याला लावली शिस्त; कामाचा सर्वपक्षीय गौरव
तहसीलदार अमोल मोरे यांनी राहाता तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला चांगली शिस्त लावली. महसूल विभागातील कामकाज अधिक गतिमान करण्यासोबतच नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या सत्कारासाठी एकत्र आले, हे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मानले जात आहे.
प्रांताधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल दैनिक साईदर्शन परिवाराच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button