
शेती बरोबर जोड धंदा म्हणून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे मात्र दुधाला मिळणारा रास्त भाव हा कमी मिळत असल्याने आजरोजी हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कारण जनावरांना लागणारा चारा, पशुखाद्य यांच्या किंमती वाढल्या आहेत तर दुसरीकडे दूध उत्पादन करताना घेतलेली मेहनत, जनावरांचे शेड, पाणी, मजूर या खर्चाची बेरीज केली तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही
कारण आजरोजी शासनाने ठरवून दिलेले भाव बावीस ते पंचवीस रुपयांपर्यंत आहे त्यात फॅट आणि डिग्री ची सक्ती वेगळीच. राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी चांगल्या प्रकारे माहित आहे, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विखे पाटील यांनी पाच रुपये अनुदानाची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात ऎशी टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान अजूनही भेटलं नाही, तर विखे पाटील यांनी राज्यातील दूधसंघाची कॅबिनेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाचे भाव ठरवून दिले होते
मात्र आजरोजी त्याची अंमलबजावणी व पालणं झालेल दिसत नाही.तसेच सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात दुधाला चौतीस ते सदतीस रुपये भाव दिला जात आहे मात्र विखे पाटील ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या नगर जिल्ह्यातील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वीस ते बावीस रुपये प्रति लिटर इतका भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे.कारण एकाच राज्यात दुध खरेदीच्या भावामध्ये हा भेदभाव का ? हाच प्रश्न यारूपाने उपस्थित झाला असून शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवसा्याबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची मोठी साथ आहे. सध्या शेतकऱ्यांचे अवकाळी तसेच दुष्कळाने मोठे आर्थिक नुकसान झाले असताना या संकटावर मात करत त्यांना आधार ठरणारा दुग्ध व्यवसाय सुद्धा दूध भावामुळे जर अडचणीत आला असेल तर यावर दुग्धविकास मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे.
कारण दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून कमी भावात दुधाची खरेदी करून दूधसंघ तथा अन्य कंपन्या मात्र ग्राहकांना तेच दूध प्रक्रिया करून विक्री करताना पन्नास ते साठ रुपयांपर्यंत वसुल करते मंग केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले दूधसंघ आणि डेऱ्या यांना शेतकऱ्यांच्या वेदना, दुःख याची जाणीव का होत नाही हेच खरं शेतकऱ्यांचं दुर्दैव्य म्हणावं लागेल. हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर लवकर तोडगा निघाला नाही तर शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिति आहे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी एकत्र करून एक भव्य दिंडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहे.