Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
क्राईमशिर्डी

लग्नात बॅग, पर्स चोरी करणारा अल्पवयीन आरोपी रोख रकमेसह जेरबंद शिर्डीतून दररोज गाड्या चोर, चैन स्नॅचिंग करणारे पाकीटमारी करणारे चोर नेमके कोणाचे जावई? 

शिर्डी प्रतिनिधी/ 

sai nirman
जाहिरात

शिर्डी येथे लग्न समारंभात बॅग, पर्स चोरी करणारा अल्पवयीन आरोपीस रोख रकमेसह ताब्यात घेण्याची कारवाई एलसीबी टिम’ने केली
याबाबत समजलेली माहिती अशी की,  दि. ३ जुलै  रोजी  सिल्व्हर ओक लॉन्स  येथील रिसेप्शना वेळी  पुतणी या हातातील पर्स बाजूला ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. त्यावेळी एक अनोळखी मुलाने पुतणीची ८ लाख ५० हजार  रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली, या किसनलाल बाबुलाल कोठारी (रा. बोलठाण, ता. नांदगांव, जिल्हा नाशिक) यांच्या फिर्यादीवरून  शिर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३९२/२४ भारतीय न्याय संहिता क. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्या होताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला   यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सूचना देऊन पथक रवाना केले. एलसीबी टिम’ने सिल्व्हर ओक लॉन्स शिर्डी येथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. तसेच रिसेप्शन वेळी कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग व फोटो ग्राफर यांच्याकडील व्हिडीओ शुटींग व फोटो तपासले असता एक गो-या रंगाचा मुलगा बॅग उचलून घेऊन जातांना दिसून आला. एलसीबी पथकाने  फुटेज सोशलमिडीयाव्दारे तसेच गुप्तबातमीदारांना पाठविले होते. या पथकाने दि.१३ जुलै  रोजी संशयीत मुलाचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये चोरी करणारा गो-या रंगाचा व अंगामध्ये राखाडी रंगाचा नक्षीकाम असलेला शर्ट घातलेला मुलगा पाठीवर बॅग घेऊन पत्रकार चौकाकडून तारकपुर बसस्थानकाकाडे पायी जात आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ  तारकपूर रस्त्याने जाऊन पहाणी करता एक १४ ते १५ वर्षे वयाचा गो-या रंगाचा पाठीवर बॅग घेतलेला व रस्त्याने पायी चाललेला मुलगा दिसला. त्यास थांबवून त्याचेकडे चौकशी करता तो अल्पवयीन (विधीसंघर्षीत) असल्याचे निष्पन्न झाले.  अल्पवयीन मुलाची पंचा समक्ष झडती घेता त्याचे झडतीमध्ये रोख रक्कम मिळून आली.  रोख रकमेबाबत त्याच्याकडे विचारपुस करता त्याने मागील १० ते १२ दिवसांपूर्वी शिर्डी येथील लग्नातून चोरी केलेल्या बॅगेतील रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने  विधीसंघर्षीत बालकास ४५ हजार  रुपये रोख रकमेसह ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली     पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे. 

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button