कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे असेही सामाजिक सेवेचे कार्य!
कोपरगाव येथील पोलीस निरीक्षक खाकी वर्दीतील देवमाणूस वासुदेव देसले हे नेहमी आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक कार्यातही तत्पर असतात, हे नुकतेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिसून आले.
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायतचे मतदान सुरू होते. त्याच वेळेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे भेट देण्यासाठी तेथे गेले असता त्यांना एक वृद्ध मतदार मतदान केंद्राकडे जाताना दिसल्यानंतर त्यांनी या वृद्ध मतदाराला स्वतःहून मोठी मदत केली. मतदान झाल्यानंतर सुद्धा मदत केली.

इतर तिथे असणारे कार्यकर्ते युवक तरुण सर्व हे पाहत होते .मात्र कोणीही प्रत्यक्ष मदत केली नाही. मात्र वासुदेव देसले यांनी स्वतः गाडीखाली उतरून या वृद्ध मतदाराची संपर्क केला .चर्चा करून त्यांना मतदानासाठी मोठे सहकार्य केले. अशी आपल्या शासकीय कर्तव्यावर असताना सुद्धा सामाजिक सेवेचे भान ठेवून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे कार्य कायम सुरू असते. आतापर्यंत असे अनेक उदाहरण घडले आहेत. अशा या कार्याची प्रशंशा नागरिकांकडून सध्या होत आहे.