Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच संवेदनशीलता अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा आदर्श उपक्रम

शिर्डी : कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर कणखर आणि धडाडीची भूमिका घेणारे शिर्डीचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी आपला वाढदिवस अनाथाश्रमातील बालकांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला.

sai nirman
जाहिरात

वाढदिवसानिमित्त वाकचौरे यांनी अनाथाश्रमातील बालकांना फळे आणि कपड्यांचे वाटप केले. अचानक मिळालेल्या या आनंदामुळे बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना बालकांसोबत त्यांनी काही काळ संवाद साधत त्यांचा आनंद द्विगुणित केला.

सामान्यतः वाढदिवस म्हटला की मोठा खर्च, दिखावा आणि जल्लोष केला जातो. मात्र, दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वाकचौरे यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत तोच आनंद गरजू आणि अनाथ बालकांसोबत वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संवेदनशील उपक्रमातून ‘सेवा हीच खरी समाजभक्ती’ हा संदेश देण्यात आला.

DN SPORTS

यावेळी अनाथाश्रमातील पालक तसेच उपस्थितांनी उत्साहात वाढदिवस साजरा करून सोमनाथ वाकचौरे यांना शुभेच्छा दिल्या. बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून वाकचौरे यांचाही आनंद द्विगुणित झाला.

कायद्याचा भंग करणाऱ्यांसाठी कडक, मात्र गरजूंसाठी मायेचा हात पुढे करणारा अधिकारी, अशी त्यांच्या कार्यशैलीची वेगळी ओळख या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे शिर्डीसह परिसरात कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button